शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात

By admin | Updated: October 22, 2015 01:00 IST

रणजी ट्रॉफी ‘ब’ गटात मुंबई सलग तिसरा विजय मिळवण्याच्या निर्धाराने बडोदा विरुध्द मैदानात उतरेल. त्याचवेळी घरच्या मैदानावर मुंबईला रोखण्यासाठी बडोदा

मुंबई : रणजी ट्रॉफी ‘ब’ गटात मुंबई सलग तिसरा विजय मिळवण्याच्या निर्धाराने बडोदा विरुध्द मैदानात उतरेल. त्याचवेळी घरच्या मैदानावर मुंबईला रोखण्यासाठी बडोदा संघाने कंबर कसली आहे. सलामीच्या सामन्यात आंध्र प्रदेश विरुद्धचा सामना अनिर्णितआवस्थेत सुटल्यानंतर मुंबईकरांनी पंजाबचा दणदणीत पराभव केला. तर यानंतर गतउपविजेत्या तामिळनाडूचा अवघ्या एका विकेटने पराभव करुन स्पर्धेत विजयी कूच केली. हे दोन्ही विजय घरच्या मैदानावर मिळवले असल्याने मुंबईकरांची विजयी कूच कायम राखण्यासाठी खरी कसोटी लागेल.दुसऱ्या बाजूला बडोदा संघाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात तामिळनाडू विरुध्द पराभव स्वीकारल्यानंतर बडोदाने दुसऱ्या सामन्यात रेल्वेला एक डाव व ११३ धावांनी धडक दिली. तर आंध्र प्रदेश विरुध्दचा तिसरा सामना अनिर्णित अवस्थेत सुटला. ‘ब’ गटात बलाढ्य मुंबईने वर्चस्व राखताना ३ सामन्यांतून २ विजय व एक अनिर्णित अशा कामगिरी करीत सर्वाधिक १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर बडोदाने ३ सामन्यांतून एक विजय, एक पराभव व एक अनिर्णित अशा कामगिरीसह ८ गुण कमावले असून ते पाचव्या स्थानी आहेत.मुंबईच्या फलंदाजीची मदार कर्णधार आदित्य तरे, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, अखिल हेरवाडकर व सिध्देश लाड यांच्यावर असेल. त्याचवेळी शार्दुल ठाकूर, विशाल दाभोळकर, धवल कुलकर्णी आणि बलविंदर संधू यांच्यावर मुंबईच्या गोलंदाजीची भिस्त असेल.मुंबई : आदित्य तरे (कर्णधार), अखिल हेरवाडकर, श्रीदीप मांगेला, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, अभिषेक नायर, सिध्देश लाड, निखिल पाटील (ज्यू.), धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, बलविंदर सिंग संधू (ज्यू.), विशाल दाभोळकर, अभिषेक राऊत, बद्रे आलम आणि हरमीत सिंग.बडोदा : वाघमोडे (कर्णधार), भार्गव भट्ट, गगनदीप सिंग, हार्दिक पंड्या, मोनील पटेल, युसुफ पठाण, हितेश सोळंकी, मुर्तुजा वोहरा, दीपक हुडा, केदार देवधर, सागर मंगलोरकर, भार्गव पटेल, बाबासफी पठाण, पीनल शाह आणि स्वप्नील सिंग.