शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

मोर्कल उल्लेखनीय ठरला - डिव्हिलियर्स

By admin | Updated: October 20, 2015 02:37 IST

डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करीत दक्षिण आफ्रिका संघाला भारताविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोलंदाज मोर्नी मोर्कलची

राजकोट : डेथ ओव्हर्समध्ये अचूक मारा करीत दक्षिण आफ्रिका संघाला भारताविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोलंदाज मोर्नी मोर्कलची दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने प्रशंसा केली. मोर्कलच्या पाय सुजलेला असतानाही त्याने अचूक मारा केला, असे डिव्हिलियर्स म्हणाला.डिव्हिलियर्सने सांगितले की,‘सहा षटके गोलंदाजी केल्यानंतर मोर्नीने त्याच्या पायावर सूज असल्याचे सांगितले. त्याने परतीच्या स्पेलमध्ये चांगला मारा केल्यामुळे अखेरच्या षटकांसाठी त्याचे एक षटक राखून ठेवावे लागले. मैदान सोडून जाणे त्याला सहज शक्य होते, पण पायावर सूज असतानाही त्याने मैदान न सोडता अचूक मारा केला आणि विजयाचा शिल्पकार ठरला.’ विजयासाठी २७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. डिव्हिलियर्सने यष्टिरक्षक क्विंटन डिकॉकची प्रशंसा केला. डिकॉकने ११८ चेंडूंना सामोरे जाताना १०३ धावा फटकावल्या. डिव्हिलियर्स म्हणाला,‘खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आणि अखेरपर्यंत हार न मानता संघर्ष कायम राखला. मी सामन्यापूर्वी आणि सामन्यादरम्यानही संघाच्या बैठकीमध्ये याचा पुनरुच्चार केला. डिकॉकने शानदार कामगिरी केली. फिरकीपटू व वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. खेळाडू म्हणून तो परिपक्व झाला आहे. त्याने शतकी खेळी करीत टीकाकारांना चोख उत्तर दिले.’ (वृत्तसंस्था)चौथ्या वन-डेत मोर्कलच्या खेळण्याबाबत साशंकतातिसऱ्या वन-डे सामन्यात डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी करीत दक्षिण आफ्रिकाला भारताविरुद्ध विजय मिळवून देणाऱ्या मोर्कलच्या २२ आॅक्टोबरला होणाऱ्या चौथ्या वन-डेत खेळण्याबाबत साशंकता आहे. मोर्कल म्हणाला,‘मला दुखापतीची चिंता सतावत आहे. आमचे वैद्यकीय पथक चांगले असून आगामी दोन दिवसांमध्ये त्यांची मदत मिळेल. मला सहाव्या षटक्यात दुखापत झाली. यानंतरच्या लढतीत मी खेळू शकेल, असे मला वाटत नाही. आगामी २४ तासांमध्ये दुखापतीचे स्वरूप स्पष्ट होईल.’चौथी लढत चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होईल. मोर्कलने तिसऱ्या सामन्यात ३९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने विराट कोहली (७७) आणि अजिंक्य रहाणे यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले.