शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटच्या प्रश्नावर मोदींचे स्मित

By admin | Updated: December 13, 2015 02:38 IST

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करायला पाहिजे, असे मत विश्वकप विजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले. तर

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करायला पाहिजे, असे मत विश्वकप विजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले. तर, उभय संघांदरम्यान मालिकेचा निर्णय खेळाडू नाही तर सरकार घेईल, असे मत विश्वकप विजेते भारतीय कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले. दोन्ही दिग्गज अष्टपैलू कपिल व इम्रान एका वृत्तवाहिनीतर्फे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. इम्रान यांनी सांगितले, ‘‘उभय देशांदरम्यान क्रिकेट होणे आवश्यक आहे. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उभय देशांदरम्यान क्रिकेट व्हायला पाहिजे, असे म्हटले, त्या वेळी मोदी यांनी केवळ स्मित केले. त्यांचा होकार होता की नकार, हे मला कळाले नाही. मी सकारात्मक विचार करणारा असल्यामुळे मी होकारच समजतो.’’भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यात मालिका प्रस्तावित आहे. त्यासाठी उभय देशांच्या बोर्डांची सहमती आहे; पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) या मालिकेसाठी अद्याप सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अलीकडचे स्पष्ट केले, की मालिकेच्या आयोजनासाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आम्हाला अद्याप सरकारकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. दहशतवादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तान तहरिके इन्साफ पार्टीचे अध्यक्ष असलेले इम्रान म्हणाले, ‘‘ज्या वेळी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळी पाकिस्तानच्या नागरिकांनाही दु:ख झाले. काही लोकांच्या कृत्यामुळे कुणी पूर्ण देशाची मानसिकता ठरवू शकत नाही. उभय देशांदरम्यानचे संबंध सुरळीत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. क्रिकेट खेळणे बंद करणे यावरचा उपाय नाही. आमची संस्कृती एक आहे.’’इम्रान पुढे म्हणाले, ‘‘मी काही मिळवण्यासाठी राजकारणात प्रवेश केला नसून काही करण्यासाठी त्याचा स्वीकार केला आहे. मी पंतप्रधान होण्यास इच्छुक नसून लोकांची सेवा करण्यास प्रयत्नशील आहे.’’(वृत्तसंस्था) खेळाडू खेळण्यास उत्सुक आहेत; पण देशाच्या निर्णयाविरुद्ध जाणार नाहीत. उभय देशांदरम्यानचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. क्रिकेट मालिकेबाबतचा निर्णय देशाचे सरकार घेईल, खेळाडू नाही.- कपिलदेव, माजी कर्णधार, भारतआमचा मैत्रीपूर्ण वातावरणात खेळण्याचा प्रयत्न असायचा; पण चाहत्यांची गर्दी बघितल्यानंतर आमच्यावर दडपण येत होते. पराभव स्वीकारावा लागला, तरी कठीण होत असे. एक वेळ कोलकात्यामध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, त्या वेळी कुणी जागे राहणार नाही, याची खबरदारी घेत पाकिस्तानमध्ये दाखल झालो होतो.- इम्रान खान