शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनिवासन यांच्याविरोधात मोदी - पवारांची 'फिल्डींग'

By admin | Updated: February 26, 2015 10:55 IST

श्रीनिवासन व त्यांच्या समर्थकांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २६ - बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचे लढाई आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचली आहे. श्रीनिवासन व त्यांच्या समर्थकांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून श्रीनिंची 'विकेट' घेण्यासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. 
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीत शरद पवारांनी श्रीनिवासन अथव त्यांच्या कट्टर समर्थकांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ देणार नाही असे मोदींना सांगितले. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाने बीसीसीआच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास मज्जाव केला आहे. श्रीनिवासन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजय पटेल यांना अध्यक्षपदी बसवण्याची रणनिती श्रीनिवासन यांनी आखली आहे. या माध्यमातून बीसीसीआयवरील वर्चस्व कायम राखण्याचे श्रीनिवासन यांचे मनसुबे आहेत. तर शरद पवार यांना श्रीनिवासन यांचे मनसुबे उधळून लावायचे आहेत. 
श्रीनिवासन किंवा त्यांच्या समर्थकांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही असे पवारांनी मोदींना सांगितले आहे. जगातील सर्वात श्रीमंत बोर्डावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपा व पवार यांच्यात गुफ्तगू सुरु असल्याचे वृत्तात म्हटले आहे. भाजपाचा पाठिंबा असलेल्या कोणत्याही उमेदवाराला शरद पवारही समर्थन देतील अशी शक्यता आहे. संबंधीत उमेदवार हा राजकारणातला नसेल पण त्याचे भाजपा व राष्ट्रवादीशी सलोख्याचे संबंध असतील त्यालाच मैदानात उतरवले जाईल असे सूत्रांनी सांगितले. शरद पवार हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी इच्छूक नाही असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  राजकारणाच्या मैदानात एकमेकांना 'साथ' देऊन 'सबका विकास' साधणारे मोदी व पवार आता क्रिकेटच्या मैदानात कोणाचा विकास साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक २ मार्चला होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ मार्च आहे.