शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सीचे धडाकेबाज पुनरागमन; बार्सिलोना विजयी

By admin | Updated: October 17, 2016 04:54 IST

शानदार खेळाच्या जोरावर बार्सिलोना एफसीने एकतर्फी झालेल्या सामन्यात डिपोर्टिवो ला कारुना संघाचा ४-० असा धुव्वा उडवला.

माद्रिद : दुखापतीतून सावरलेल्या स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने आपला जलवा दाखवताना केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर बार्सिलोना एफसीने एकतर्फी झालेल्या सामन्यात डिपोर्टिवो ला कारुना संघाचा ४-० असा धुव्वा उडवला. मेस्सीसह रफीन्हा आणि लुईस सुआरेज यांनीही गोल करून सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. या शानदार विजयासह ला लीगा स्पर्धेत अव्वल स्थानी असलेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि रियाल माद्रिद यांच्यानंतर दोन गुणांनी बार्सिलोना मागे आहे. आक्रमक सुरुवात केलेल्या बार्सिलोनाने सुरुवातीपासूनच डिपोर्टोवा संघावर दडपण ठेवले.पहिल्या सत्रात मैदानाबाहेर बसलेल्या मेस्सीने दुसऱ्या सत्रात तब्बल तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले. या वेळी त्याने पुनरागमनाच्या अवघ्या ३ मिनिटांमध्येच शानदार गोल करून बार्सिलोनाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, अल्कांतरा रफिन्हा याने दोन गोल करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तसेच, सुआरेजनेदेखील आपल्या लौकिकानुसार गोल करून शानदार कामगिरी केली. या वेळी ३-० अशा भक्कम आघाडीवर असलेल्या बार्सिलोनाने मध्यंतरानंतर मेस्सीच्या जोरावर डिपोर्टिवोच्या आव्हानातली हवा काढली. त्याचवेळी, अन्य सामन्यांत अ‍ॅटलेटिको माद्रिदने यानिक कारास्कोच्या चमकदार हॅट्ट्रिकच्या जोरावर ग्रेनाडा संघाचा ७-१ असा फडशा पाडला. निकोलस गेटान यानेही दोन गोल करताना यानिकला चांगली साथ दिली. तसेच, रियाल माद्रिदनेही दणदणीत बाजी मारताना रियाल बेटिसला ६-१ असे लोळवले. पहिल्याच सत्रात चार गोल करून माद्रिदने आपला विजय निश्चित केला होता. (वृत्तसंस्था)