शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल सुशीलकुमारची मोदींना हाक

By admin | Updated: May 14, 2016 01:52 IST

दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार तसेच देशाला आॅलिम्पिक कोटा मिळवून देणारा नरसिंग यादव यांच्यात ७४ किलो फ्री स्टाईलसाठी चाचणी घ्यायची की नाही याबद्दलचा वाद

नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार तसेच देशाला आॅलिम्पिक कोटा मिळवून देणारा नरसिंग यादव यांच्यात ७४ किलो फ्री स्टाईलसाठी चाचणी घ्यायची की नाही याबद्दलचा वाद थेट पंतप्रधानांच्या दारात पोहोचला आहे. सुशीलने याबाबत पंतप्रधानांना विनंती पत्र लिहिले. सुशीलने नरसिंगसोबत चाचणी घेण्यासाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल, भारतीय आॅलिम्पिक संघटना आणि भारतीय कुस्ती महासंघाला पत्र लिहिले. नरसिंगसोबत माझी चाचणी घ्या. यात जो जिंकेल त्याला पाठविण्याची विनंती सुशीलने या पत्रात केली. यासंदर्भात कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणसिंग यांनी एका वाहिनीला दिलेले वक्तव्य फारच मजेदार आहे. ते म्हणतात, ‘हे प्रकरण लवकर संपणारे नाही. पंतप्रधानांपर्यंत ते जाऊ शकते. अशी स्थिती आल्यास देशहिताचा निर्णय घ्यावा लागेल. याशिवाय त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्या मल्लाने पात्रता गाठली तोच आॅलिम्पिकसाठी जाईल.’दरम्यान, सुशीलचे गुरू सतपाल म्हणाले, ‘आमची एकच मागणी आहे की दोन्ही मल्लांमध्ये चाचणी घ्या. चाचणी घेण्यात वाईट काहीच नाही. जो जिंकेल तो आॅलिम्पिकमध्ये आणखी सरस कामगिरी करेल. या प्रकरणी सर्वांना विनंती करू तसेच चाचणी घेण्यास सांगू. ’सुशील आणि सतपाल हे यासंदर्भात क्रीडामंत्री सोनोवाल यांची देखील भेट घेणार आहेत. सोनोवाल यांनी कालच सुशील-नरसिंग वादात क्रीडा मंत्रालय दखल देणार नाही, असे स्पष्ट केले होते. कुस्ती महासंघाने भारतीय आॅलिम्पिक संघटनेला रिओ आॅलिम्पिकसाठी मल्लांची जी यादी पाठविली त्यात ७४ किलो वजन प्रकारात सुशीलच्या नावाचा समावेश नव्हता. बृजभूषण यांच्या वक्तव्यानंतर सुशीलसाठी आॅलिम्पिकचे रस्ते बंद झाल्याचे मानले जात आहे. पण सुशील अद्याप आशावादी आहे. त्याने थेट पंतप्रधानांनाच हस्तक्षेप करण्याची गळ घातली आहे. (वृत्तसंस्था)