शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

हॅट्ट्रिक साधणार...

By admin | Updated: December 31, 2015 01:52 IST

जागतिक टेनिस पुरुष एकेरीतील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू स्टेनिस्लास वावरिंका आगामी चेन्नई ओपन स्पर्धेसाठी सज्ज असून या स्पर्धेत विजेतेपद पटकावून शानदार हॅट्ट्रिक नोंदवण्याचा निर्धार त्याने केला आहे.

चेन्नई : जागतिक टेनिस पुरुष एकेरीतील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू स्टेनिस्लास वावरिंका आगामी चेन्नई ओपन स्पर्धेसाठी सज्ज असून या स्पर्धेत विजेतेपद पटकावून शानदार हॅट्ट्रिक नोंदवण्याचा निर्धार त्याने केला आहे.स्वित्झर्लंडच्या वावरिंकाने या स्पर्धेच्या गेल्या दोन सत्रांत वर्चस्व राखले आहे. वावरिंका म्हणाला, की चेन्नईला येणे मला खूप आवडतं. मोसमाची सुरुवात या स्पर्धेने होणार असल्याने ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. येथील टेनिसप्रेमी जबरदस्त आहेत आणि स्टेडियममधील वातावरणही खूप चांगले आहे. या स्पर्धेत जेतेपद राखण्याच्या निर्धारानेच खेळणार असून प्रत्येक सामन्यानुसार मी माझी रणनीती आखेल.चेन्नई ओपन ४ ते ५ जानेवारीदरम्यान रंगणार असून वावरिंकासह जगभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे. या स्पर्धेत मुख्य आकर्षण असेल तो वावरिंका. त्याने दोन ग्रँडस्लॅमसह एकूण ११ विजेतेपद जिंकली आहेत. वावरिंका म्हणाला, ‘२०१५ वर्षे माझ्यासाठी चांगले ठरले व माझ्या कामगिरीवर समाधानी आहे. यंदाचे फ्रेंच ओपन माझे सर्वोत्तम जेतेपद ठरले. या वेळी मी अव्वल नोव्हाक जोकोविचला नमवण्यात यशस्वी ठरलो. त्याच्याविरुद्ध केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे. विशेष म्हणजे कारकिर्दीत दोन ग्रँडस्लॅम पटकावताना जगातील दोन अव्वल खेळाडूंना नमवल्याचा आनंद आहे.- स्टेनिस्लास वावरिंका