शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्रसिंह धोनीने तोडला सचिनचा षटकारांचा विक्रम

By admin | Updated: October 24, 2016 04:24 IST

जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर आणि भारतीय वन-डेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा १९५ षटकारांचा विक्रम मोडला

मोहाली : जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर आणि भारतीय वन-डेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा १९५ षटकारांचा विक्रम मोडला. धोनीने रविवारी मोहाली येथे न्यूझीलंडविरुद्ध आपला तिसरा षटकार ठोकून ही विक्रमी कामगिरी केली. सचिनने ४६३ सामन्यांमध्ये १९५ षटकार मारले होते. धोनीने २८१ सामन्यांत १९६ षटकार मारून ही कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (३५१), न्यूझीलंडचा श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (२७०), वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (२३८), ब्रँडन मॅक्युलम (२००) धोनीच्या पुढे आहेत. (वृत्तसंस्था) धोनीने गाठला नऊ हजार धावांचा पल्लाभारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नऊ हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा, तर जगातील १७ वा फलंदाज ठरला. विश्वकपविजेता कर्णधार धोनीने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात डावखुरा फिरकीपटू मिशेल सँटेनरच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत हा पल्ला गाठला. धोनीने नऊ हजार धावांचा पल्ला गाठल्यानंतर स्टेडियममध्ये असलेल्या विशाल स्क्रीनवर भारतीय कर्णधाराचे अभिनंदन करण्यात आले.धोनीचा यष्टिचितचा विश्वविक्रमजगातील सर्वोत्तम यष्टिरक्षकांमध्ये गणला जाणारा आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येभारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपांमध्ये १५१ फलंदाजांना यष्टिचित करण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला. धोनीने येथे न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे लढतीत रविवारी लेगस्पिनर अमित मिश्राच्या गोलंदाजीवर रॉस टेलर आणि ल्यूक राँची यांना यष्टिचित करीत हा पराक्रम केला. धोनीने कसोटी, वन-डे आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत १५१ फलंदाजांना यष्टिचित करण्याची कामगिरी केली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने १३९ फलंदाजांना यष्टिचित करण्याची कामगिरी केली.विश्वकपविजेता कर्णधार धोनीने आपल्या कारकिर्दीत ९० कसोटी सामन्यांत ३८ स्टंपिंग, २८१ वन-डेमध्ये ९१ स्टंपिंग आणि ७३ टी-२० सामन्यांत २२ स्टंपिंग केलेल्या आहेत. तिन्ही प्रकारांत सर्वाधिक बळी घेण्यामध्ये धोनी ७१२ बळींसह तिसऱ्या स्थानी आहे. धोनीने कारकिर्दीत ५६१ झेल टिपले असून १५१ फलंदाजांना यष्टिचित केले आहे. आॅस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलख्रिस्ट व दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर धोनीच्या तुलनेत आघाडीवर आहेत. गिलख्रिस्टने ३९६ सामन्यांत ९०५ बळी घेतले आहेत. असून बाऊचरने ४६७ सामन्यांत ९९८ बळी घेतले आहेत.बाऊचरने ९६ फलंदाजांना यष्टिचित केले, तर गिलख्रिस्टने ९२ फलंदाजांना यष्टिचित केले आहे.