१७ वर्षांआतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे उपविजेतेपदावर समाधान; हरयाणाचे विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:08 IST2026-04-29T11:07:55+5:302026-04-29T11:08:18+5:30
महाराष्ट्र संघाने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकासह १७८ गुण घेतले.

१७ वर्षांआतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे उपविजेतेपदावर समाधान; हरयाणाचे विजेतेपद
छत्रपती संभाजीनगर : १७ वर्षांआतील गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांच्या पहिल्या दिवशी मंगळवारी मुलींमध्ये हरयाणाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. विभागीय क्रीडा संकुलात भारतीय ओलिम्पिक संघटनेच्या मान्यतेने भारतीय कुस्ती संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने जिल्हा कुस्तीगीर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हरयाणा संघाने सहा सुवर्ण, एक रौप्य, तीन कांस्यपदकांसह २१५ गुण मिळविले. महाराष्ट्र संघाने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकासह १७८ गुण घेतले. उत्तर प्रदेशला सहा कांस्यपदकांसह १२६ गुण घेत तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
वजनीगटानुसार निकाल (पहिले तीन स्थान)
४० किलो : कस्तुरी सहारे महाराष्ट्र, पलक, राजस्थान, हेतल गुजरात व तानिया हरयाणा. ४३ किलो : दीक्षा, हरयाणा, अनुष्का दहिभाते, महाराष्ट्र, हंसा, राजस्थान व प्रीती यादव, उत्तर प्रदेश. ४६ किलो : रोहिणी देवबा, महाराष्ट्र, अनामिका, राजस्थान, तृतीय: आकांक्षा यादव, उत्तर प्रदेश व विनाक्षी, हरयाणा. ४९ किलो : निकिता, हरयाणा, वैष्णवी तोरवे, महाराष्ट्र, साक्षी पाल, उत्तर प्रदेश व दीपांशी राठी, दिल्ली. ५३ किलो : अक्षरा दिल्ली, निशा, हरयाणा, अनिशा नायक मध्य प्रदेश व सिद्धी तानाजी, महाराष्ट्र. ५७ किलो : साक्षी, हरयाणा, कृषिती चौधरी, दिल्ली, राखी लटावा, पंजाब व रिया नागर.
६१ किलो : मनीषा, हरयाणा, अंजली वेतुळ, मोहना दीती, पंजाब व वंशिका, उत्तर प्रदेश. ६५ किलो : सृष्टी करे, महाराष्ट्र, कनक, पंजाब, मान्या राजपूत, दिल्ली व अंतरा, हरयाणा. ७० किलो : तानिया, हरयाणा, दिशा शौकीन, दिल्ली, पूर्वी शर्मा, पंजाब व जयश्री वर्मा, मध्य प्रदेश. ७३ किलो : गरिमा, हरयाणा, राजवीर कौर, पंजाब, पायल यादव, मध्य प्रदेश व तनिषा, राजस्थान.