शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन होणार बेघर

By admin | Updated: June 8, 2016 04:18 IST

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन (एमओए)वर बेघर होण्याची वेळ आली आहे

शिवाजी गोरे,

पुणे- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन (एमओए)वर बेघर होण्याची वेळ आली आहे. सध्या संघटनेचे कार्यालय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीच्या अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये असून, ते धोकादायक बनले असल्याचा अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिका फ क्षेत्रीय कार्यालयाने दिल्यामुळे कार्यालय मोकळे करण्याची नोटीस संघटनेला देण्यात आली आहे.
तर, दुसरीकडे एमओएने राज्याच्या क्रीडा विभागाला शिवछत्रपती क्रीडासंकुलात कार्यालयासाठी जागा देण्याबाबत जानेवारी महिन्यात मागणी अर्ज केला असून, त्या पत्राला क्रीडा विभागाने केराची टोपली दाखविली. अद्याप जागा देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कार्यालय कुठे करायचे, हा प्रश्न संघटनेला पडला आहे. सत्ताबदल होताच, संघटनेला डावलण्याचे कारस्थान सुरू असल्याची चर्चा राज्याच्या क्रीडाक्षेत्रात रंगली आहे.
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमचे बांधकाम ३७ वर्षांपूर्वी म्हणजे १९७९मध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून त्याची पाहणी एप्रिल महिन्यात करण्यात आली. ही पाहणी वास्तुविशारदाकडून करण्यात आली आहे. त्यांनी त्यांचा अहवाल ३ जून २०१५ रोजी पीसीएमसीकडे सादर केला आहे.
या अहवालात मगर स्टेडियमची डागडुजी ताबडतोब करण्यात यावी. कारण हे बांघकाम जुने झाले अजून केव्हाही काहीही होऊ शकते. त्या स्टेडियमचे स्लॅब, पिलर, छत, भिंती या सर्व कमकुवत झाल्या आहेत. या बांधकामाचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा, मोठी हाणी हाऊ शकते. कारण तेथे काही कार्यालयेसुद्धा आहेत. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमओएच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात पाहणी करून एमओएच्या कार्यालयासाठी जागासुद्धा निश्चित केली होती.
त्या वेळी आर्किटेक्टला बोलावून त्यांच्यामार्फत प्लॅनसुद्धा तयार करण्यात आला होता. पण, आघाडी सरकार जाऊन युती सरकार आल्यानंतर क्रीडासंकुलात एमओएचे कार्यालय बांधण्याच्या नियोजनाला युती सरकारने खो देत असल्याचे बोलले जात आहे.
>क्रीडा खात्याकडे एमओएने शिवछत्रपती क्रीडासंकुलात कार्यालयासाठी जागा मिळावी म्हणून जानेवारी महिन्यात पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचे उत्तर अजूनपर्यंत मिळालेले नाही. या संदर्भात क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबरसुद्धा चर्चा झालेली आहे; पण पुढे कोणतीच हालचाल झालेली नाही. पीसीएमसीकडून एमओएला कार्यालय मोकळे करण्याची नोटीससुद्धा मिळालेली आहे. मी रविवारी आमचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली आहे. त्यांनी ‘क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करतो,’ असे सांगितले.
-बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस, एमओए
>महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचा कार्यालयासाठी जागा मिळण्याबाबतचा अर्ज क्रीडा खात्याला मिळलेला आहे. असे महत्त्वाचे निर्णय मंत्रालयात होतात. आम्ही त्यांचा अर्ज सचिवांकडे पूर्वीच पाठविला आहे. मंत्रालयातून अजून काही त्याचे उत्तर आलेले नाही.
- नरेंद्र सोपल, सहसंचालक, क्रीडा विभाग