महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी

By Admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:57+5:302014-12-02T00:35:57+5:30

कुडरूवाडी : महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवराय कुस्ती संकुल, परंडा रोड, कुडरूवाडी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी दिली.

Maharashtra Kesari Wrestling Selection Test | महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी

महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी

डरूवाडी : महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवराय कुस्ती संकुल, परंडा रोड, कुडरूवाडी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी दिली.
कुडरूवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दि. 1 रोजी सकाळी 8 ते 12 पर्यंत मल्लांची वजने घेण्यात आली. सायंकाळी 4 वाजता विठ्ठल कॉर्पोरेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते कुस्ती स्पध्रेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी सुहास शहा होते. 2 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 11 पहिले सत्र व दुपारी 3 ते 8 दुसरे सत्र होईल. बक्षीस वितरण राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धा गादी व माती अशा दोन्ही विभागात विविध वजनी गटात होतील. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माढा तालुका तालीम संघाचे अध्यक्ष वामनभाऊ उबाळे, वस्ताद अण्णासाहेब ढाणे यांनी केले आहे.

Web Title: Maharashtra Kesari Wrestling Selection Test