क्रांती क्रीडा मंडळाचे विजेतेपद

By Admin | Updated: May 11, 2015 02:26 IST2015-05-11T02:26:18+5:302015-05-11T02:26:18+5:30

मालाडच्या क्रांती क्रीडा मंडळाने एकतर्फी झालेल्या सामन्यात सांताक्रुझच्या श्रीकृष्ण क्रीडा मंडळाचा ३७-१० असा फडशा पाडून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटाचे शानदार विजेतेपद पटकावले.

Kranti Sports Board's championship | क्रांती क्रीडा मंडळाचे विजेतेपद

क्रांती क्रीडा मंडळाचे विजेतेपद

मुंबई : मालाडच्या क्रांती क्रीडा मंडळाने एकतर्फी झालेल्या सामन्यात सांताक्रुझच्या श्रीकृष्ण क्रीडा मंडळाचा ३७-१० असा फडशा पाडून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटाचे शानदार विजेतेपद पटकावले.
ओम भारत क्रीडा मंडळाच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत क्रांती संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. पंकज जाधवने जबरदस्त अष्टपैलू खेळ करताना सामन्यात दबदबा राखला. मध्यंतरालाच क्रांती संघाने मोठी आघाडी घेऊन विजेतेपद निश्चित केले होते. यानंतर ओमकार ठुकरुलने दमदार पकडी करताना श्रीकृष्णचे आक्रमण रोखण्यात मोलाचे योगदान दिले. या दोघांच्या जोरावर क्रांती संघाने सहजपने विजेतेपदास गवसणी घातली. पराभूत संघाकडून मयुर धुमाळने कडवी लढत देताना एकाकी झुंज दिली.

Web Title: Kranti Sports Board's championship