शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बँगलोर प्लेआॅफसाठी ‘कोहली’फाय

By admin | Updated: May 23, 2016 01:19 IST

दिल्लीकर विराट कोहलीे (५४*) याने केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरने दिल्ली डेअरडेव्हिल्सला ६ विकेट्सनी हरवून आयपीएल स्पर्धेची प्लेआॅफ फेरी गाठली.

रायपूर : दिल्लीकर विराट कोहलीे (५४*) याने केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरने दिल्ली डेअरडेव्हिल्सला ६ विकेट्सनी हरवून आयपीएल स्पर्धेची प्लेआॅफ फेरी गाठली. आयपीएलच्या नवव्या पर्वातील शेवटचा सामना दिल्ली आणि बँगलोर या दोन्ही संघासाठी ‘जिंका किंवा बाहेर व्हा’ अशीच ठरली होती. पण, एखाद्या लढाऊ योद्ध्याप्रमाणे संघाला तळातून प्लेआॅफच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन आलेल्या विराट कोहलीने आजही लढावू बाण्याने अर्धशतक करून संघाला सलग चौथ्या विजयासह थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचविले. बँगलोरच्या गोलंदाजांनी दिल्लीला ८ बाद १३८ असे मर्यादित धावसंख्येवर रोखल्यानंतर बँगलोरने हे आव्हान ११ चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. लक्ष्य छोटे असले, तरी बँगलोरची सुरुवात निराशाजनक झाली. गेल (१) आणि ए. बी. डिव्हिलियर्स (६) हे दोघे केवळ १७ धावांत तंबूत परतल्याने बँगलोरवर दबाव आला, पण ‘सेनापती’ कोहलीने के. एल. राहुलच्या साथीने संघाची डळमळणारी नौका स्थिर केली. राहुल (३८) आणि वॉटसन (१४) हे पाठोपाठ बाद झाल्याने दिल्लीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या; परंतु कोहलीने कोणतीही ‘रिस्क’ न घेता स्टुअर्ट बिन्नीच्या साथीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. तत्पूर्वी, नाणेफेक गमावून फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि ऋषभ पंत फक्त एका धावेवर श्रीनाथ अरविंदच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन बाद झाला. विशेष म्हणजे अरविंदच्या गोलंदाजीवर सलामीवीर डिकॉकदेखील सुदैवी ठरला. त्या वेळेस बॅकवर्ड पॉइंटला जॉर्डनने त्याचा कठीण झेल सोडला. डिकॉकने नंतर अरविंदच्या पुढच्या षटकात षटकार व चौकार मारला. करुण नायर (११) यानेदेखील शेन वॉट्सनला षटकार ठोकला; परंतु लेगस्पिनर चहलच्या चेंडूवर कर्णधार विराट कोहलीने मागे धावत जाताना त्याचा शानदार झेल टिपला. दिल्लीला पॉवरप्लेमध्ये २ बाद ४३ धावाच करता आल्या.संजू सॅमसन (१७) याने चहलच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि पुढच्या षटकातही चौकार मारला; परंतु याच गोलंदाजाच्या पुढच्या चेंडूवर तो राहुलच्या हाती झेल देऊन बसला.सॅम बिलिंग्जदेखील चार धावांवर जॉर्डनच्या गोलंदाजीवर गेलकरवी झेलबाद झाला. अरविंदने जॉर्डनच्या याच षटकात पवन नेगीला जीवदान दिले. त्या वेळेस नेगीने खातेही उघडले नव्हते. संक्षिप्त धावफलक : दिल्ली डेअरडेव्हिल्स : २0 षटकांत ८ बाद १३८. (क्विंटन डीकॉक ६0, सॅमसन २७, चहल ३/३२, गेल २/११)रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : १८.१ षटकांत ४ बाद १३९. (विराट कोहली ५४*, के. एल. राहुल ३८. ब्रेथवेट १/१८)