शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर खेळीमुळे केकेआर विजयी

By admin | Updated: May 18, 2017 08:59 IST

पावसाच्या व्यत्ययानंतर केकेआरला ६ षटकांत ४८ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. केकेआरचा संघ हे देखील पूर्ण करु शकेल की नाही अशी शंका निर्माण झाली होती.

आॅनलाइन लोकमतबंगळुरु, दि. 18 - पावसाच्या व्यत्ययानंतर केकेआरला ६ षटकांत ४८ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. केकेआरचा संघ हे देखील पूर्ण करु शकेल की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र गौतम गंभीरच्या संयमी ३२ धावांच्या खेळीने केकेआरने हा विजय साकारला. आणि गतविजेत्या संघाला स्पर्धेबाहेर केले. सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा सलामीवीर ख्रिस लीन ६ धावांवर बाद झाला. उथप्पा देखील लगेचच तंबूत परतला. गरज नसताना चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न युसुफ पठाणला नडला. केकेआरने ७ चेंडूत १२ धावा करून तीन गडीगमावले होते. त्यानंतर कर्णधार गौतम गंभीर याने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली आणि १९ चेंडूत ३२ धावांची संयमी खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर केकेआरने हे लक्ष्य गाठले. पावसाच्या आधी उमेश यादव आणिनॅथन कुल्टर नाईल यांनी सनरायजर्सच्या फलंदाजांना त्रस्त केले होते.त्यांनी भेदक मारा करत हैदराबादला कमी धावसंख्येतच रोखले त्याचा फायदा त्यांना डकवर्थ लुईस नियमात झाला. हैदराबादची धावगती कमी असल्यानेच केकेआरला सोपे लक्ष्य मिळाले. कुल्टर नाईलने ३ तर यादवने २ गडी बाद केले.पावसाने सुमारे तीन तासांचा खेळ थांबवला. आजच्या सामन्यात अखेरचा ६ षटकांचा खेळ होऊ शकला नसता तर हैदराबादला विजेते घोषित करण्यात आले असते.मात्र गंभीर आणि केकेआरचे दैव बलवत्तर होते म्हणून अखेरच्या काही वेळात पाऊस थांबला मैदानही सामन्यासाठी सज्ज झाले. आणि सहा षटकांचा खेळ झाला.एलिमनेटर विजेत्या केकेआरचा सामना आता क्वालिफायर २ मध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात रायजींग पुणे सुपरजायंट्स सोबत लढेल.