शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपेक्षाही कबड्डी लोकप्रिय ठरेल : राकेश

By admin | Updated: September 14, 2016 05:09 IST

कबड्डी या खेळाची मुळे ही ग्रामीण भागातच रुजली आहेत; परंतु आता या खेळाचा शहरी भागातही प्रसार झाला आहे. पालकांचाही या खेळाकडे ओढा वाढत आहे

जयंत कुलकर्णी,  औरंगाबादकबड्डी या खेळाची मुळे ही ग्रामीण भागातच रुजली आहेत; परंतु आता या खेळाचा शहरी भागातही प्रसार झाला आहे. पालकांचाही या खेळाकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांत क्रिकेटपेक्षाही कबड्डी हा खेळ जास्त लोकप्रिय ठरेल, असा विश्वास कबड्डीचा आघाडीचा खेळाडू राकेश कुमार याने ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.परभणी येथे मंगळवारपासून मराठवाडास्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तो औरंगाबादेत विमानतळावर आल्यानंतर त्याने हा विश्वास व्यक्त केला. निजामपूरस्थित राकेश कुमार याची खेळाडू आणि कर्णधार म्हणून कामगिरी उल्लेखनीय आहे. २००४ आणि २००६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावून देणाऱ्या कबड्डी संघात त्याने निर्णायक योगदान दिले होते. त्याचप्रमाणे त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवल्यानंतर २०१० आणि २०१४ च्या आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. मंगळवारी औरंगाबादेत विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्याने ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने संवाद साधला. प्रो-कबड्डीमुळे खेळाडूंना एक ओळख मिळाली असल्याचे राकेश कुमार याचे म्हणणे आहे. तो म्हणाला, ‘‘याआधी आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलो, तरी आम्हाला कोणी ओळखत नव्हते; परंतु प्रो-कबड्डी सुरू झाल्यापासून या खेळाला एक नवीन वलय मिळाले. लोकांमध्ये आमची विशेष ओळख निर्माण झाली आहे. कबड्डी खेळात विशेषत: ग्रामीण आणि मध्यमवर्गीय भागातील खेळाडू असतात. प्रो-कबड्डीमुळे खेळाडूंना आर्थिकदृष्ट्याही मदत झाली आहे आणि त्यामुळेच हा खेळ आता एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. यात फेडरेशनचेही योगदान निश्चित महत्त्वाचे आहे. आता प्रत्येक पालकाचाही ओढा आपला मुलगा कबड्डी खेळावा याकडे वाढला आहे.’’