शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जोश्ना चिनप्पाची बाजी

By admin | Updated: September 7, 2015 00:27 IST

भारताच्या जोश्ना चिनप्पा हिने चमकदार कामगिरी करताना रविवारी पार पडलेल्या इंडियन स्क्वॉश सर्किट स्पर्धेत महिलांचे विजेतेपद पटकावले

मुंबई : भारताच्या जोश्ना चिनप्पा हिने चमकदार कामगिरी करताना रविवारी पार पडलेल्या इंडियन स्क्वॉश सर्किट स्पर्धेत महिलांचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी भारताचे आशास्थान असलेल्या महेश माणगावकरला मात्र पुरुषांच्या गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याने भारताच्या दुहेरी विजेतेपदाचे स्वप्न भंगले.वरळीच्या एनएससीआय स्टेडियममध्ये झालेल्या झालेल्या या स्पर्धेच्या महिलांच्या अंतिम सामन्यात जोश्नाने आक्रमक खेळ करताना इजिप्तच्या अग्रमानांकित हबिबा मोहम्मदचा केवळ ४७ मिनिटांमध्ये ३-० असा फडशा पाडला. पहिला गेम सहजपणे जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये जोश्नाने हबिबाकडून कडवा प्रतिकार मिळाला. मात्र अंतिम क्षणी बाजी मारत तिने २-० अशी भक्कम आघाडी घेतली. यावेळी हबिबा पुनरागमन करणार अशी शक्यता होती. मात्र विजेतेपद निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेताना जोश्नाने तिसऱ्या गेममध्ये तुफान आक्रमक खेळ करताना हबिबाला दडपणाखाली ठेवले आणि ११-८, ११-९, ११-६ असा विजय मिळवला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या अंतिम सामन्यात मात्र भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अव्वल खेळाडू इंग्लंडच्या अ‍ॅड्रीयन वॉलरने अपेक्षित वर्चस्व राखताना यजमान भारताच्या महेशचे कडवे आव्हान ३-१ असे परतावून विजेतेपदावर नाव कोरले. पहिले दोन गेम गमावून पिछाडीवर पडलेल्या महेशने झुंजार खेळ करताना तिसऱ्या गेममध्ये १४-१२ अशी बाजी मारीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महेश सामन्यात बरोबरी साधणार असे दिसत होते. मात्र यानंतर अनुभवी वॉलरने महेशला फारशी संधी न देता ६१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात ११-९, ११-२, १२-१४, ११-६ असे विजेतेपद पटकावले. (क्रीडा प्रतिनिधी)