जॉन्टी -होड्सने मुलगी इंडियासाठी केली मंदिरात पूजा

By Admin | Updated: May 3, 2016 12:58 IST2016-05-03T12:58:52+5:302016-05-03T12:58:52+5:30

दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू आणि आयपीएल संघ मुंबई इंडियन्स टीमचा फिल्डींग कोच जॉन्टी -होड्सने आपली मुलगी इंडियासाठी पुर्णपणे हिंदु शास्त्र व परंपरेनुसार पूजापाठ केला

Jonty-Hinds worshiped the girl in India for worship | जॉन्टी -होड्सने मुलगी इंडियासाठी केली मंदिरात पूजा

जॉन्टी -होड्सने मुलगी इंडियासाठी केली मंदिरात पूजा

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 - दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू आणि आयपीएल संघ मुंबई इंडियन्स टीमचा फिल्डींग कोच जॉन्टी -होड्सने आपली मुलगी इंडियासाठी पूजा केली आहे. महत्वाचं म्हणजे जॉन्टी -होड्सने पुर्णपणे हिंदु शास्त्र व परंपरेनुसार पूजापाठ केला. सांताक्रूझमधील पेजावर मठात ही पूजा करण्यात आली. पुजेदरम्यान जॉन्टी रोड्सने भारतीय परंपरेतील धोतर परिधान केले होते. 
 
जॉन्टीने आपली मुलगी इंडियासाठी ही पूजा ठेवली होती. जॉन्टीच्या मुलीचा नुकताच पहिला वाढदिवस 22 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जॉन्टीने कुटुंबियांसमवेत तामिळनाडूमधील मंदिराला भेट दिली होती. जॉन्टीच्या मुलीचा जन्म भारतात झाला असल्याने त्याने तिचं नाव इंडिया ठेवलं आहे. 'भारताची श्रीमंत संस्कृती आणि भौगोलिक विविधतेने आपण भारावून गेलो आहोत त्यामुळेच मुलीचं नाव इंडिया ठेवलं होतं', असं जॉन्टीने सांगितलं होतं. 
'मी येथे खूप वेळ घालवला आहे. भारतामध्ये संस्कतींच असलेलं मिश्रण, ऐतिहासिक वारस आणि परंपरा या गोष्टी मला खूप आवडतात. भारत अध्यात्मिक देश आहे. मला हे एकीकरण खूप आवडतं. जीवनात समतोल राखणं महत्वाचं असतं', असं जॉन्टीने गेल्यावेळी सांगितलं होतं. 
 

Web Title: Jonty-Hinds worshiped the girl in India for worship