जोको, राफा यांची शानदार सलामी

By Admin | Updated: May 25, 2016 03:08 IST2016-05-25T03:08:42+5:302016-05-25T03:08:42+5:30

जागतिक टेनिस पुरुष क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदाल या बलाढ्य खेळाडूंनी फ्रेंच ओपन स्पर्धेची दुसरी फेरी गाठताना

Joko, Rafa's great salute | जोको, राफा यांची शानदार सलामी

जोको, राफा यांची शानदार सलामी

पॅरिस : जागतिक टेनिस पुरुष क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदाल या बलाढ्य खेळाडूंनी फ्रेंच ओपन स्पर्धेची दुसरी फेरी गाठताना विजयी सलामी दिली. त्याचवेळी द्वितीय मानांकित ब्रिटनच्या अँडी मरेला मात्र विजयी कूच करण्यासाठी तब्बल ५ सेटपर्यंत झुंजावे लागले.
जोकिविचने तैपेच्या येन सुन लूचे आव्हान ६-४, ६-१, ६-१ असे सहजपणे परतावून शानदार आगेकूच केली. तर पहिले दोन सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर मरेने आपला हिसका दाखवताना झेक प्रजासत्ताकच्या रादेक स्तेपानेकला ३-६, ३-६, ६-०, ६-३, ७-५ असे नमवले. दुसरीकडे नदालने तुफानी विजयी सलामी देताना आॅस्टे्रलियाच्या सॅम ग्रोथला ६-१, ६-१, ६-१ असे लोळवले.

Web Title: Joko, Rafa's great salute