शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जयराम, प्रणीत दुसऱ्या फेरीत

By admin | Updated: September 29, 2016 04:25 IST

भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम आणि बी. साई प्रणीत यांनी आज येथे कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसरी फेरी गाठली. तथापि, के. श्रीकांत,

सोल : भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम आणि बी. साई प्रणीत यांनी आज येथे कोरिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसरी फेरी गाठली. तथापि, के. श्रीकांत, पी. कश्यप, एच. एस. प्रणय आणि तन्वी लाड यांना पराभवाचा सामना करावा लागला.आज २९ वर्षांचा झालेल्या जयरामने कोरियाच्या जियोन हिकोक जीन याचा ४५ मिनिटांत २३-२१, २१-१८ असा पराभव केला. मुंबईच्या या खेळाडूची पुढील फेरीत गाठ पडणार आहे ती चीनचा हुआंग युशियांग याच्याशी.प्रणीतने एका तासापेक्षा जास्त चाललेल्या लढतीत चिनी-तैपेईचा सुन जेन हाओ याचा २१-१३, १२-२१, २१-१५ असा पराभव केला. पुढील फेरीत तो कोरियाच्या सहाव्या मानांकित सोन वॉन याच्याशी दोन हात करील.तथापि, रिओ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या आठव्या मानांकित श्रीकांतला हाँगकाँच्या वोंग विंगच्या व्हिन्सेंटविरुद्ध १०-२१, २४-२२, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. कश्यपलादेखील चौथ्या मानांकित टियान होवेईविरुद्ध २२-२०, १०-२१, १३-२१ अशी पराभवाची चव चाखावी लागली. टियान आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमधील उपविजेता आहे.स्विस ओपन चॅम्पियन प्रणयला चिनी-तैपेईच्या वांग जू वेईविरुद्ध पहिल्या फेरीत २३-२१, १७-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव खेळाडू तन्वी लाड हिला डेन्मार्कच्या अ‍ॅना थिया मेडसनविरुद्ध १८-२१, २१-१३, १८-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. (वृत्तसंस्था)