जळगावचा दक्ष जाधव याचे शानदार वर्चस्व

By Admin | Updated: June 15, 2016 03:52 IST2016-06-15T03:52:04+5:302016-06-15T03:52:04+5:30

राज्यस्तरीय टेबल टेनिस मानांकन स्पर्धेत जळगावच्या दक्ष जाधव याने मिडल जेट गटांत पुण्याच्या नील मुळ््ये याचा पराभव केला. तर ग्लोरिया जॉर्ज, संपदा भिवंडकर,

Jalgaon's Jadhav's splendid supremacy | जळगावचा दक्ष जाधव याचे शानदार वर्चस्व

जळगावचा दक्ष जाधव याचे शानदार वर्चस्व

पनवेल : राज्यस्तरीय टेबल टेनिस मानांकन स्पर्धेत जळगावच्या दक्ष जाधव याने मिडल जेट गटांत
पुण्याच्या नील मुळ््ये याचा पराभव केला. तर ग्लोरिया जॉर्ज, संपदा भिवंडकर, मैनाक निस्टाला, मिहीका रोहिरा, दिपीत पाटील यांनी आपआपल्या गटात अव्वल स्थान पटकावले .
मंगळवारी उल्वे येथील रामशेट ठाकूर स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथे झालेल्या स्पर्धेत दक्ष जाधवने मिडलजेट मुलांच्या गटांतील अंतिम सामन्यात नील मुळ््येवर ११-४,११-५,७-११, ११-७ असा पराभव केला. या गटात अव्वल मानांकित दक्ष जाधव हाच संभाव्य विजेता होता. गेल्या अठवड्यात पुणे येथे झालेल्या स्पर्धेतही दक्षने याच गटात विजेतेपद पटकावले होते. दक्षने सलग दोन गेम जिंकल्यावर तिसऱ्या गेममध्ये नीलने कडवा प्रतिकार केला. हा गेम त्याने ७ -११ असा जिंकला अखेरच्या गेममध्ये पुन्हा दक्षचीच सरशी झाली. दक्ष जाधवने उपांत्य फेरीत अहमदनगरच्या हर्षवर्धन मोरे याचा पराभव केला होता. तर मुलींच्या मिडजेट गटात ग्लोरिया जॉर्ज हिने जेनीफर वर्गीस हिचा पराभव केला. ग्लोरियाने जेनीफरचा ५-११,११-७,११-६,११-६ असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यावर ग्लोरियाने शानदार खेळ केला. तीने पुढचे सलग तीनही सेट जिंकले आणि जेनिफरला पराभूत केले. मुलींच्या कॅडेट गटात संपदा भिवंडकर हिने टिया डिसुझा हिच्यावर १२-१०, ११-४,५-११,१४ -१२ असा विजय मिळवला. मुलांच्या कॅडेट गटात मैनाक निस्ताला याने राजवीर शाह याच्यावर ११-५,११-९,५-११, १२-१० असा विजय मिळवला.

मुलींच्या सबज्युनिअर गटात मिहीका रोहिरा हिने नेहा महांगडे हिच्यावर ११-५, १२-१०, ११-८, ११-८ असा सलग चार सेटमध्ये विजय मिळवला. नेहा हिने दुसऱ्या सेट मध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र अखेरच्या काही मिनिटात मिहीकाने उत्तम खेळ करत बाजी मारली. सब ज्युनियर मुलांमध्ये दिपीत पाटील याने देव श्रॉफ याच्यावर ५-११, १३-११, ११-९,११-४, ११-९ असा विजय मिळवला.

Web Title: Jalgaon's Jadhav's splendid supremacy