शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडीजबाबत भाष्य करणे कठीण

By admin | Updated: February 10, 2015 02:04 IST

जर भावना व आनंद मिळणे याचा विचार केला तर जगातील प्रत्येकाने विश्वकप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला दुसरे स्थान दिले असते.

जर भावना व आनंद मिळणे याचा विचार केला तर जगातील प्रत्येकाने विश्वकप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाला दुसरे स्थान दिले असते. या संघाचा सुवर्णकाळ हा आता इतिहास झाला आहे. त्यांचा निराशाजनक कालखंड किमान दोन पिढ्यांपासून सुरू आहे. त्यानंतरही विंडीज संघाने चमकदार कामगिरी करावी, अशी आपली इच्छा असते. कामगिरी कशीही झाली तरी विंडीज संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यांवरील हास्य मात्र कायम असते, त्यामुळे कदाचित चाहत्यांची भावना तशी असावी. विंडीज संघाचा इतिहास चमत्कारिक आहे, तर वर्तमान स्थिती नाजूक आहे. २० षटकांच्या खेळामध्ये वेस्ट इंडिज संघ विस्फोटक असल्याचे दिसून येतो. २० षटकांच्या खेळात हा संघ कुठल्याही संघापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम आहे. पण, यात काही षटकांची भर पडली तर प्रत्येक षटकासोबत संघापुढील आव्हानांमध्ये भर पडत जाते. विश्वकप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाच्या मोहिमेचे नेतृत्व कोण करणार? याचे उत्तर शोधण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली. प्रतिभावान सॅम्युअल्स की ख्रिस गेल. गेल टी-२० क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाज असल्याचे दिसून येते. ५० षटकांच्या खेळात गेल ‘लॉटरी’प्रमाणे भासतो. विंडीज संघाला प्रतिस्पर्धी संघापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी गेलला आपल्या आक्रमक फलंदाजीच्या व्याख्येमध्ये बदल करावा लागणार आहे. गेल व सॅम्युअल्स यांना ड्वेन ब्राव्हो, पोलार्ड, सॅमी आणि रसेल यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात यश आले तर हा संघ धोकादायक ठरू शकतो; पण पोलार्ड व ब्राव्हो यांचा संघात समावेश नाही आणि त्याचे कारणही कळलेले नाही. त्यामुळे सॅमी व रसेल यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे. ही जबाबदारी पेलणे त्यांच्यासाठी सोपे नाही. केमार रोच, जेरोम टेलर आणि उदयोन्मुख शेल्डन कोटरेल यांचा समावेश असलेल्या विंडीज संघाची गोलंदाजीची बाजू समतोल भासते; पण भेदक आहे असे म्हणता येणार नाही. कर्णधार जेसन होल्डरला गोलंदाज म्हणून अद्याप छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे त्याच्यापुढील अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. कर्णधार स्वत:च संघात स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संघातील अन्य खेळाडूंपुढे आदर्श निर्माण करू शकत नाही. विंडीज संघ विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्यात यशस्वी ठरला तर आश्चर्य वाटेल. कमकुवत गोलंदाजी आक्रमण असलेल्या संघाविरुद्ध वेस्ट इंडिज संघ लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरेल; पण याची हमी देता येणार नाही. (टीसीएम)