शहरं
Join us  
Trending Stories
1
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
"२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
4
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
5
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
6
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
7
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
8
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
10
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
11
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
12
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
13
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
14
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
15
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
16
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
17
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
18
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
19
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
20
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

आयएसएलने स्पर्धात्मक वातावरण दिले!

By admin | Updated: December 4, 2014 01:51 IST

भारतीय फुटबॉलमध्ये दिलेल्या योगदानासाठी गेल्या आठवड्यात मला जो हॉफ आॅफ फेम मिळाला तो मी माझा मोठा बहुमान मानतो

भारतीय फुटबॉलमध्ये दिलेल्या योगदानासाठी गेल्या आठवड्यात मला जो हॉफ आॅफ फेम मिळाला तो मी माझा मोठा बहुमान मानतो. आशियाई किंवा भारतीय वंशाच्या माणसाला मिळालेला हा सन्मान निश्चितच मोठा आहे. भारतासाठी खेळण्याचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे मला भाग्य लाभले. माझ्या परिश्रमाचे चीज झाले. यामुळे मोठ्या लोकांच्या पंक्तित जाऊन बसलो याचाही आनंद आहे.
विदेशात मी बरी एफसीकडून खेळण्याचा अनुभव घेतला. माझ्या कारकीर्दीत आयएसएल असती तर बरे वाटले असते. मोठे खेळडू आणि मान्यवर प्रशिक्षकांसोबत खेळण्याचा आनंद विरळाच. आव्हानात्मक कामगिरी आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी मिळावे यासाठी खेळाडू परदेशात जातात. उत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध किंवा सोबत खेळून तुम्ही
स्वत:चा दर्जा सुधारू शकता. हिरो आयएसएलमुळे भारतीयांना ती संधी उपलब्ध झाली ती देखील भारतात! चांगल्या खेळाडूंना सुधारायची यामुळे संधी मिळेल आणि परिस्थितीत बदल घडून येईल.
तरुण खेळडूंना आणखी संधी हवी, या नॉर्थ ईस्ट युनायटेडचा प्रशिक्षक रिकी हर्बर्ट याच्या मताशी मी सहमत आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेड तरुण पण अनुभवहीन संघ आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेडचे मोठे खेळाडू विविध संघांकडून खेळताना दिसतात पण गुणवत्ता असूनही अनुभव नसल्याने यंदा त्यांना फारशी चमक दाखविता आली नाही. या स्पर्धेत अ‍ॅटलिटिको डी कोलकाता आणि चेन्नईयन हे माझे फेव्हरिट आहेत पण गोव्याला कमी लेखता येणार नाही.
या संघाने दमदार पुनरागमन केले. चेन्नई तगडा संघ आहे पण माझ्या भाकीतानुसार एलिनोसारख्या खेळाडूची दुखापत उपांत्य लढतीसाठी महागडी ठरू शकते. कोलकाताची घसरण झाली तरी उपांत्य फेरीसाठी हा संघ माझ्या मताप्रमाणे दावेदार असेल. बाद फेरीचे दडपण खेळाडूंवर असल्याचे हबासने कबूल केले. खरेतर असे घडायला नको. (टीसीएम)