शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

आंतरराष्ट्रीय कॅरम : भारताचा डबल धमाका! पुरुष, महिलांचे सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 12:21 AM

पीवायसी हिंदू जिमखाना येथे विश्वविजेते प्रशांत मोरे व एस. अपूर्वा यांच्या जोरावर भारताने अनुक्रमे श्रीलंका व मालदीवचा ३-० असा पराभव केला.

पुणे : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन आॅफ पुणे यांच्या यजमानपदाखाली आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन (आयसीएफ) चषक स्पर्धेत भारतीय संघाने सांघिक गटात डबल धमाका केला. यजमान भारताच्या पुरुषांनी श्रीलंकेचा, तर महिलांनी मालदीवचा सहजपणे धुव्वा उडविला. पीवायसी हिंदू जिमखाना येथे विश्वविजेते प्रशांत मोरे व एस. अपूर्वा यांच्या जोरावर भारताने अनुक्रमे श्रीलंका व मालदीवचा ३-० असा पराभव केला.पुरुष एकेरीत प्रशांत व श्रीलंकेचा २०१२ चा विश्वविजेता निशांत फर्नांडो यांच्यातली लढत चांगलीच रंगली. प्रशांतने ही लढत २५-२१, २५-७ अशी जिंकली असली तरी निशांतने त्याला झुंजवले. यानंतर झहीर पाशाने शाहीद ईल्मीला २५-१०, २५-१६ असे नमविले.राजेश गोहिल व इर्शाद अहमद यांनी दुहेरीत दिनेथ दुलक्षणे-अनास अहमद यांना २५-१४, २५-४ ने नमवून बाजी मारली. भारतीयांनी पहिल्या सेटमध्ये ११ गुणांचे दोन बोर्ड मारले, तर दुसऱ्यामध्ये दहा व नऊ गुणांचे दोन बोर्ड मारत आपले वर्चस्व राखले. बांग्लादेशने मालदीवचा २-१ ने पराभव करून कांस्यपदक मिळविले. महिलांमध्ये माजी विश्वविजेती रश्मीकुमारीने मालदीवच्या अमिनाथ विधाधचा २५-१०, २५-० असा पराभव केला. विश्वविजेती अपूर्वाने अमिनाथ विषमाचा २५-५, २५-५ असा पराभव करत विजेतेपद भारताच्या अवाक्यात आणले.

टॅग्स :Puneपुणे