शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा दुसरा दिवस पदकाविना

By admin | Updated: February 26, 2017 04:06 IST

भारतीय नेमबाजांना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पदक पटकावता आले नाही. जोरावरसिंग संधू व नीरजकुमार यांनी

नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पदक पटकावता आले नाही. जोरावरसिंग संधू व नीरजकुमार यांनी अनुक्रमे पुरुषांच्या ट्रॅप व २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीमध्ये निराशा केली. पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेच्या पात्रता गटात जोरावर संधू ११८च्या स्कोअरसह चौथ्या स्थानी राहिला. त्याने अखेरच्या फेरीत ३५ व २८ असा स्कोअर नोंदवला, तर क्वॉलिफिकेशनच्या ५ सिरीजमध्ये २५ पैकी २३, २४, २३, २४ आणि २४ अशा गुणांची नोंद केली. जोरावर कांस्यपदकाच्या शर्यतीत होता; पण ३०व्या शॉटमध्ये त्याला लक्ष्याचा वेध घेता आला नाही. त्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले. माजी विश्वकप व आशियाई स्पर्धेतील पदकविजेता रंजन सोढी याचा लहान भाऊ बीरेनदीप सोढी ट्रॅपच्या पात्रता फेरीत ३३व्या स्थानी राहिला. विश्वकप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीसाठी पात्रता गाठणाऱ्या नीरजला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. गुरप्रीतसिंग व हरप्रीतसिंग पात्रता फेरीतच गारद झाले. १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत एकाही भारतीयाला अंतिम फेरी गाठता आली नाही. (वृत्तसंस्था)पुरुषांच्या १० मीटर फायनलमध्ये दीपक कुमार पाचव्या स्थानी राहिला, तर मेघना सज्जनार पात्रता फेरीत १०व्या स्थानी होती. ट्रॅप स्पर्धेत इटलीची सिमोन एम्ब्रोसियोने विश्वविक्रमासह सुवर्ण पटकावले. जियोवान्नी पेलियेलोने रौप्य, तर स्पेनच्या अलबर्टो फर्नांडिसने कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुलमध्ये चीनच्या जियेजी लाओने सुवर्ण आणि जुनमिन लीनने रौप्यपदक पटकावले. अजरबैजानच्या रुस्लान लुनेव्हला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक फायनलमध्ये चीनच्या बुहान सोंग व मिंगयांग वू यांनी सुवर्णपदक पटकावले. जपानच्या अत्सुशी शिमाडा व अयानो शिमिझू दुसऱ्या, तर चीनचे मेंग्याओ शी व गेंगचेंग सुई तिसऱ्या स्थानावर राहिले. (वृत्तसंस्था)