शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

भारताची हॅट्ट्रिकची आशा धुळीस

By admin | Updated: October 18, 2015 23:14 IST

ब्रिटनने दोन वेळेचा गत चॅम्पियन भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाला रविवारी सडन डेथमध्ये ४-३ असे पराभूत करताना पाचव्या सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धा जिंकली.

जोहोर बाहरू : ब्रिटनने दोन वेळेचा गत चॅम्पियन भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाला रविवारी सडन डेथमध्ये ४-३ असे पराभूत करताना पाचव्या सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धा जिंकली.ब्रिटनने साखळी सामन्यात भारताला ४-३ असे पराभूत केले होते आणि अंतिम सामन्यातदेखील हीच स्थिती राहिली. या विजयाबरोबर ब्रिटनने गत वर्षी भारताकडून अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला आणि भारताला विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्यापासून वंचित ठेवले.निर्धारित वेळेत ही लढत २-२ अशी बरोबरीत राहिली. त्यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्येही २-२ अशी बरोबरी राहिली. त्यामुळे सामन्याच्या निर्णयासाठी सडन डेथचा आधार घ्यावा लागला. त्यात ब्रिटनने बाजी मारताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.भारत आणि ब्रिटन यांच्यातील विजेतेपदाची लढत खूपच रोमहर्षक आणि संघर्षपूर्ण ठरली. दोन्ही संघांनी जबरदस्त आक्रमण आणि बचाव यात सारखाच मुकाबला केला. ब्रिटनने चौथ्या मिनिटाला ल्यूक टेलरने पेनल्टी कॉर्नवर केलेल्या गोलच्या बळावर आघाडी मिळवली; परंतु हरमनप्रीतसिंह याने १२ व्या मिनिटाला गोल करीत भारताला बरोबरी साधून दिली. दुसऱ्या हाफमध्ये गुरजंतसिंहने ४१ व्या मिनिटाला शानदार गोल करताना भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली; परंतु चारच मिनिटांनी जॅक टनर याने त्याचा स्पर्धेतील पहिला गोल नोंदवताना ब्रिटनला २-२ अशी बरोबरी साधून दिली.निर्धारित वेळेत स्कोर बरोबर राहिल्यानंतर पेनल्टी शूट आऊटचा आधार घ्यावा लागला. पेनल्टी शूट आऊटमध्ये हरजितसिंह आणि हरमनप्रीतसिंह यांनी गोल केले, तर परविंदरसिंह, गुरजंतसिह आणि नीलकांत शर्मा हे गोल करू शकले नाहीत. त्यानंतर सामना सडन डेथमध्ये पोहोचला. हरजितने भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली, तर ल्यूक टेलरने ३-३ अशी ब्रिटनला बरोबरी साधून दिली. पुढच्या प्रयत्नात परविंदसिंहला गोल करता आला नाही आणि जॅक क्ली याने गोल करीत ब्रिटनच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी यजमान मलेशियाने अर्जेंटिनाला पराभूत करीत कास्यपदक जिंकले, तर आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५-0 असा धुव्वा उडवत पाचवे स्थान मिळवले. पाकिस्तानी संघ सहाव्या आणि अखेरच्या स्थानी फेकला गेला. (वृत्तसंस्था)