शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिला संघाने जिंकले कांस्य

By admin | Updated: December 23, 2016 01:29 IST

संगीता कुमारीने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने १८ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत

बॅकॉक : संगीता कुमारीने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने १८ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरले. या निर्णायक सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण कोरियाचा ३-० असा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला.
कांस्यपदकासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात संगीताने ५५व्या आणि ५८व्या मिनिटाला गोल करून भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले, तर याआधी अनुभवी रितूने ४५व्या मिनिटाला पहिला गोल करून भारताचे खाते उघडले होते.
दोन्ही संघांनी बचावात्मक सुरुवात करताना पहिल्या सत्रात आपल्या आक्रमणाला मुरड घातली. यामुळे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर भारतीय महिलांनी दुसऱ्या सत्रात वेगवान खेळ करत वर्चस्व राखले. रितूने मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना जबरदस्त गोल करून भारताला आघाडीवर नेले, तर यानंतर भारताला थेट पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली. परंतु, मनप्रीत कौरने मारलेला फटका कोरियाची गोलरक्षक ली डा बोम हिने यशस्वीपणे रोखला. तरीही सामन्यावर भारताचे वर्चस्व होते.
यानंतर सुरू झाला तो, संगीताचा धडाका. ५५व्या मिनिटाला लालरेमसियामीने दिलेला पास अचूकपणे आपल्याकडे घेताना संगीताने दोन बचावपटूंना चकमा देत अप्रतिम गोल करून भारताची आघाडी २-० अशी केली. यानंतर याच गोलची पुनरावृत्ती करताना संगीताने भारताला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राखत भारतीय महिलांनी कांस्यपदक निश्चित केले. (वृत्तसंस्था)