शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
3
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
4
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
5
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
6
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
7
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
8
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
9
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
10
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
11
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
12
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
13
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
14
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
15
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
16
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
17
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
18
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
19
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
20
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिक असल्याचे जगजाहीर करणाऱ्या दुती चंदचा आणखी एक खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 14:30 IST

दुती चंदने शनिवारी समलैंगिक असल्याचे जाहीर होते.

नवी दिल्ली : भारताची सर्वात जलद महिला धावपटू दुती चंदने शनिवारी समलैंगिक असल्याचे जाहीर होते. ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील मैत्रीणीशी प्रेमसंबंध असल्याचे द्युतीनं एका सांगितले. मात्र, तिने मैत्रीणीची ओळख सांगण्यास नकार दिला. उगाच आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये ही त्यामागची दुतीची भावना आहे. पण आता तर दुतीने एक खळबळजनक खुलासा केला आहे.

भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच सार्वजनिकरित्या समलैंगिक असल्याचा दावा केला आहे. दुतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक झाले, परंतु हे जगजाहीर करण्यामागेही एक कारण असल्याचे समोर आले आहे. 

दुती खुलासा करताना म्हणाली की, " सध्या माझी ओळख फार वेगळी झाली आहे. पण माझे एका मुलाबरोबर पाच वर्षे अफेअर होते. ही गोष्ट आहे २००९ सालची. तेव्हा मी आठवीमध्ये होती. त्यावेळी मला एका मुलाने प्रपोज केले होते. त्यानंतर आम्ही पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. पण पाच वर्षांनंतर आमचे ब्रेकअप झाले."

सध्या ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करत असून 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देण्याचा तिचा निर्धार आहे. ती म्हणाली,''मला समजून घेणारा जीवनसाथी मिळाला आहे. आपल्याला कोणासोबत आयुष्य घालवायचे आहे, याचे स्वातंत्र्य सर्वांना मिळायला हवं. समलैंगिक असलेल्यांना मी नेहमी पाठींबा दिला आहे आणि ही वैयक्तीक निवड आहे. सर्वोच्च न्यायलयानेही 377 कलमाबद्दल दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मला हे बोलण्याचे धाडस मिळाले आहे. खेळाडू म्हणून माझ्या कामगिरीवर शंका उपस्थिक करण्याचा कोणालाही अधिकार नाही. समलैंगिक संबंध ठेवणे हा माझा वैयक्तीक निर्णय आहे आणि त्याचा आदर करायला हवा. भारतासाठी मी पदक जिंकत राहीन.''  

मंगळवारी आपण असे का जाहीर केले, याचा खुलासा केला. ती म्हणाली,''माझी बहीण सतत ब्लॅकमेल करत होती. तिने माझ्याकडे 25 लाखांची मागणी केली होती. एकदा तर तिने मला मारहाणही केली. त्याबाबत मी पोलिसात तक्रारही केली आहे. तिच्या या ब्लॅकमेल करण्यामुळेच मला हे जगजाहीर करावे लागले.''  

द्युतीने 2018च्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने देशाला रौप्यपदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिचे हे दुसरे पदक ठरले. द्युतीने 100 मीटर स्पर्धेत २० वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. द्युतीने 11.32 सेकंदाची वेळ नोंदवली. 200 मीटर शर्यतीत द्युतीने 23.20 सेकंदांची वेळ नोंदवली. एकाच आशियाई स्पर्धेत 100 मी. व 200 मी. शर्यतीत पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरली. याआधी लेव्ही पिंटो, आर. ज्ञानसेखरण, पी.टी.उषा यांनी हा विक्रम केला होता. शिवाय 100 मीटर स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रमही तिच्याच नावावर आहे. 

टॅग्स :Dutee Chandद्युती चंद