शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

चक दे इंडिया! आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय महिला महिला संघाचा ११-० असा धमाकेदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:30 IST

पहिल्या हाफमध्ये दणादण गोल डागत सामना केला सेट

Women’s Asia Cup Hockey 2025 : भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप २०२५ स्पर्धेतील सलामीच्या लढतीत दिमाखदार विजय नोंदवला आहे. चीनमधील हांगझोऊच्या गोंगशू जिल्ह्यातील कॅनॉल स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर 'ब' गटातील भारत विरुद्ध थायलंड यांच्यातील सामना खेळवण्यात आला. भारतीय महिला हॉकी संघाने  ११- ० असा धुव्वा उडवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारतीय महिला हॉकी संघ या प्रतिष्ठित स्पर्धेत दिग्गज गोलकीपर सविता पुनिया आणि ड्रॅग फ्लिकर दीपिका शिवाय मैदानात उतरला आहे. दोघीही दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत भारतीय महिला संघाने मिळवलेला विजय आणखी मोठा आणि महत्त्वपूर्ण ठरतो. 

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

या दोघींनी प्रत्येकी २-२ गोल डागले, तर...

भारतीय महिला हॉकी संघाकडून उदिता दुहान आणि ब्यूटी डुंग डुंग या दोघींनी प्रत्येकी २-२ गोल डागले. उदिताने ३० व्या आणि ५२ व्या मिनिटांत पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतरित केले.  डुंग डुंग हिने ४५ व्या आणि ५४ व्या मिनिटात संघासाठी दोन गोल डागले. मुमताज खान हिने संघाला ७ व्या मिनिटाला खाते उघडून दिले. अवघ्या काही वेळातच संगीता कुमारी हिने १० व्या मिनिटाला गोल डागत ही आघाडी २-० अशी केली. १६ व्या मिनिटाला नवनीत कौर आणि   १८ व्या मिनिटाला लालरेम्सियामी हिने गोल डागल्याचे पाहायला मिळाले. थौदाम सुमन देवी (४९ व्या मिनिटाला), शर्मिला देवी (५७ व्या मिनिटाला) आणि रुताजा पिसल यांनीही (६० व्या मिनिटा) प्रत्येकी १-१ गोल डागत संघाला मोठा विजय मिळवून देण्यात पुढाकार घेतला.

आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा

पहिल्या हाफमध्ये सामना केला सेट

 हॉकीच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला संघाने पहिल्या पासून सामन्यावर पकड मिळवत ३० व्या क्रमांकावरील थायलंडला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या हाफमध्ये भारतीय महिला संघाने आक्रमक खेळाचा नजारा पेश करत ५-० अशी आघाडी मिळवली. इथंच भारतीय संघाने सामना आपल्या बाजूनं केला होता. शेवटर्यंत एकही गोल न करू देता भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्याला शून्यावर ठेवत स्पर्धेची सुरुवात धमाक्यात केली. 

आता जपान अन् सिंगापूरविरुद्ध भिडणार

यंदाच्या हंगामातील महिला आशिया कप स्पर्धेत ८ संघ सहभागी असून दोन गटात संघांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर ४ साठी पात्र ठरणार आहेत. यातील दोन अव्वल संघ १४ सप्टेंबरला फायनल खेळतील. भारतीय संघाने पहिला सामना जिंकत सुरुवात एकदम भारी केलीये. आता शनिवारी भारतीय महिला संघासमोर जपानचे आव्हान असेल. त्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात ८ सप्टेंबरला भारतीय संघ सिंगापूर विरुद्ध भिडेल. 

टॅग्स :HockeyहॉकीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ