शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

आॅस्ट्रेलिया दौ-यात भारताला ‘क्लीन स्वीप’ मिळेल

By admin | Published: November 21, 2014 12:24 AM

आॅस्ट्र्रेलियाविरुद्ध होणा-या आगामी मालिकेत भारताला यजमान संघाकडून ०-४ ने क्लीन स्वीप मिळणार असल्याचे भाकीत माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा याने वर्तविले आहे.

सिडनी : आॅस्ट्र्रेलियाविरुद्ध होणा-या आगामी मालिकेत भारताला यजमान संघाकडून ०-४ ने क्लीन स्वीप मिळणार असल्याचे भाकीत माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा याने वर्तविले आहे. सिडनी हेरॉल्डला दिलेल्या मुलाखतीत मॅक्ग्रा म्हणतो, ‘आम्ही २०११-१२ च्या मालिकेत आॅस्ट्रेलियात भारताला ४-० ने लोळविले होते. यंदा अशीच स्थिती राहील आणि भारताला ०-४ ने पराभूत व्हावे लागेल.’ आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कचा खराब फॉर्म आणि खराब फिटनेसशिवाय पाकविरुद्धची त्याची कुचकामी कामगिरी विचारात घेतली, तरीही महेंद्रसिंह धोनीचा संघ आमच्या संघाच्या तुलनेत कमुकवत ठरेल, असेही मॅक्ग्राचे मत आहे. उभय संघांदरम्यान पुढील महिन्यात ब्रिस्बेन येथे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. मॅक्ग्रा म्हणाला, ‘गेल्या मोसमात आॅस्ट्रेलिया संघाची कामगिरी देखणी झाली. या कामगिरीची पुनरावृत्ती झाली, तरी भारताला आम्ही सहज नमवू शकतो.’भारताचे विदेशातील रेकॉर्ड खराब आहे. याकडे लक्ष वेधताना मॅक्ग्रा पुढे म्हणाला, ‘भारतीय संघ आॅस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर नेहमीच अपयशी ठरला आहे. विदेशात भारताची कामगिरी फारशी चांगली नाही. १९८५ पासून भारताने आॅस्ट्रेलियात २३ पैकी केवळ दोन कसोटी सामने जिंकले. भारताने जे सामने जिंकले त्या वेळी सचिन, द्रविड आणि लक्ष्मण हे संघात होते. सध्याच्या भारतीय संघात त्यांच्या तोडीचा कुणीही फलंदाज नाही.’ मॅक्ग्रा सध्या चेन्नईतील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये नव्या दमाच्या गोलंदाजांना प्रशिक्षण देत आहे. मॅक्ग्राने कारकीर्दीत १२४ सामन्यांत ५६३ कसोटी बळी घेतले असून, २५० वन डेत ३८१ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)