शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

भारत अर्जेंटिना लढत आज

By admin | Updated: October 14, 2015 00:03 IST

गेल्या लढतीतील पराभव विसरून भारतीय ज्युनिअर हॉकी संघ पाचव्या सुलतान जोहोर कप स्पर्धेत बुधवारी अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळविण्यास प्रयत्नशील आहे

जोहोर बारू : गेल्या लढतीतील पराभव विसरून भारतीय ज्युनिअर हॉकी संघ पाचव्या सुलतान जोहोर कप स्पर्धेत बुधवारी अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळविण्यास प्रयत्नशील आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध ५-१ ने विजय मिळवीत स्पर्धेत शानदार सलामी दिली. दुसऱ्या लढतीत ब्रिटनविरुद्ध आक्रमक खेळ केला; पण प्रतिस्पर्धी संघाने दुसऱ्या हाफमध्ये चमकदार कामगिरी करीत भारतावर ४-३ ने विजय नोंदवला. भारतीय संघ विजयी मार्गावर परतत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यास उत्सुक आहे. भारताने २०१३ मध्ये दोनदा अर्जेंटिनाचा पराभव केला होता. तिसऱ्या सुलतान जोहोर कप स्पर्धेत भारताने अर्जेंटिनाविरुद्ध ३-२ ने विजय मिळवला होता, तर त्यानंतर हीरो हॉकी ज्युनिअर विश्वकप स्पर्धेत ४-२ विजय साकारला होता. यापूर्वी २००१ मध्ये होबार्टमध्ये एफआयएच ज्युनिअर विश्वकप हॉकी स्पर्धेत भारताने अर्जेंटिनाचा ६-१ ने धुव्वा उडवीत जेतेपद पटकावले होते. भारताच्या आघाडीच्या फळीत सुमित कुमार, अरमान कुरेशी, अजय यादव आणि परविंदर सिंग यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलियाचा १-० ने पराभव करीत स्पर्धेत विजयी सुरुवात करणारा अर्जेंटिना संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. भारतीय प्रशिक्षक हरेंद्रसिंग म्हणाले, ‘भारतीय संघ अर्जेंटिनाच्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. लढत रंगतदार होईल, अशी आशा आहे. आम्ही यापूर्वीही अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवला आहे. त्यांच्याविरुद्ध सर्वंच सामन्यांत सरशी साधली आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत आमची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. आम्हाला बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची आशा आहे.’ (वृत्तसंस्था)