शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर पराभवाचे सावट

By admin | Updated: July 31, 2014 04:59 IST

आघाडीच्या फलंदाजांनी बेपवाई वृत्ती दाखविल्यामुळे इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर बुधवारी टीम इंडियावर पराभवाचे सावट आले

साऊथम्प्टन : आघाडीच्या फलंदाजांनी बेपवाई वृत्ती दाखविल्यामुळे इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर बुधवारी टीम इंडियावर पराभवाचे सावट आले. ४४५ धावांचे अतिशय कठीण विजयी लक्ष्य गाठताना दुसऱ्या डावात ४२ षटकांत ११२ धावांत ४ गडी गमावल्याने हे संकट अधिकच गडद झाले आहे. भारताला अद्याप ३३३ धावांचा पल्ला सर करण्याचे आव्हान असून, अखेरच्या दिवशी सहा गडी शिल्लक आहेत. मालिकेत १-० ने आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला गुरुवारी प्रतिस्पर्धी माऱ्याला धाडसाने तोंड देत सामना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, हे देखील तितकेच खरे. मुरली विजय १२ धावा काढून बाद झाला, तर चेतेश्वर पुजाराने दोन धावांवर नांगी टाकली. शिखर धवन तारणहार ठरणार असे वाटत असताना तोदेखील ३७ धावांवर बाद झाला. फॉर्ममध्ये नसलेला विराट कोहली २८ धावा काढून परतला. खेळ थांबला तेव्हा अजिंक्य रहाणे १८ आणि रोहित शर्मा सहा धावांवर नाबाद होते. विजय आणि पुजारा हे तीन धावांच्या फरकाने बाद झाले. त्यानंतर शिखर आणि विराट देखील नऊ धावांच्या फरकाने परत आले. शिखरला ज्यो रुट याने बाद केले, तर आॅफस्पिनर मोईन अली याने पुजारा आणि विराटला आपले लक्ष्य बनविले. तत्पूर्वी, कर्णधार अ‍ॅलेस्टर कूक (नाबाद ७०) आणि जो रूट (५६) यांच्या फलंदाजीमुळे यजमान इंग्लंड संघ ४ बाद २०५ धावांवर पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांचा दुसरा डाव घोषित केला. भारताला विजयासाठी ४४५ धावांचे लक्ष्य दिले. तत्पूर्वी, पहिल्या डावात केलेल्या ५६९ धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाची दाणादाण उडाली. भारताचा पहिला डाव ३३० धावांत गुंडाळून इंग्लंडने तिसऱ्या कसोटीवर मजबूत पकड घेतली. कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक आणि गॅरी बॅलेंस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करून उपाहारापर्यंत ३१९ धावांची आघाडी मिळवून दिली. उपाहारापर्यंत यजमानांनी २ बाद ८० धावा केल्या होत्या. इंग्लंडने पहिला डाव ७ बाद ५६९ धावांवर घोषित केला. त्या उत्तरात उतरलेल्या भारतीय संघाला ३३० धावाच बनवण्यात यश आले. भारताने कालच्या ८ बाद ३२३ धावांवरून बुधवारी सुरुवात केली आणि अवघ्या सात धावांची भर टाकून भारताचा संपूर्ण संघ तंबूत परतला.