शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा झिम्बाब्वेवर ६ गडी राखून विजय

By admin | Updated: March 14, 2015 15:07 IST

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे हे भरवशाचे फलंदाज पटापट तंबूत परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
ऑकलंड, दि. १४ - सुरेश रैना (नाबाद ११०) आणि कर्णधार धोनी (नाबाद ८५) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेवर ६ गडी राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेने दिलेले २८८ धावांचे आव्हान भारताने ४८.४ षटकांतच पूर्ण केले. 
रोहित शर्मा(१६), शिखर धवन(४), विराट कोहली (३८), अजिंक्य रहाणे(१९) हे भरवशाचे फलंदाज पटापट तंबूत परतल्यानंतर रैना व धोनीने तूफान खेळी कपत विजय अक्षरश: खेचून आणला. 
रोहित शर्मा व शिखर धवनने भारताला सुरूवात तर चांगली करून दिली, मात्र ६व्या षटकांत ते दोघेही एकापाठोपाठ बाद झाल्याने भारताला दोन मोठे धक्के बसले. त्यानंतर फलंदाजीस आलेला अजिंक्य रहाणेही अवघ्या १९ धावा काढून बाद तंबूत परतला. ३८ धावांची खेळी करणारा विराट कोहली तरी भारताला सावरेल आणि विजयाच्या समीप नेईल असे वाटत होते, मात्र सिकंदर रझाच्या गोलदांजीवर तोही बाद झाला आणि भारताने महत्वाचे चार गडी गमावले. त्यानंतर रैनाने धोनीच्या साथीने सावधपणे खेळून भारताला विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेच्या पनयानगराने २ तर सिंकदर रझाने १ बळी टिपला.
तत्पूर्वी ब्रँडन टेलरच्या १३८ धावांच्या शानदार खेळीमुळे झिम्बाब्वेने भारतासमोर जिंकण्यासाठी २८८ धावांचे आव्हान ठेवले. नाणफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी घेतली. झिम्बाब्वेची सुरूवात संथ झाली आणि त्यांचे सलामीचे फलंदाज पटापट तंबूत परतले. मात्र त्यानंतर ब्रँडन टेलरने भारतीय गोलंदाजी चोपून काढत १३८ धावा केल्या आणि झिम्बाब्वेने  पावणेतीनशे धावांचा टप्पा पार केला.
भारतातर्फे मोहम्मद शमी, मोहित शर्मा व उमेश यादवने प्रत्येकी ३ तर आर. अश्विनने १ बळी टिपला.