शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

भारतासमोर मालिका विजयाचे लक्ष्य

By admin | Updated: January 19, 2017 00:52 IST

इंग्लंडविरुद्ध आज येथे होणारा मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने ‘विराट’सेना उतरणार आहे

कटक : कठीण लक्ष्याचा पाठलाग करीत विजय नोंदविणाऱ्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावताच इंग्लंडविरुद्ध आज येथे होणारा मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने ‘विराट’सेना उतरणार आहे.धावांचा पाठलाग करण्यात पटाईत असलेल्या विराटने पुण्यात स्वत: मोर्चा सांभाळून ३०० हून अधिक धावांचे आव्हान सर करीत भारताला चमत्कारिक विजय मिळवून दिला होता. कोहलीने १७ वे शतक ठोकले तर विजयाचा नायक ठरलेल्या केदार जाधव याने ६५ चेंडूत शतकी खेळी केली होती. तीनदा ३५० वर धावांचा पाठलाग करीत विजय नोंदविणारा भारत एकमेव संघ आहे. या तिन्ही विजयात विराटने शतक ठोकले हे देखील विशेष.जाधवमुळे आश्चर्यचकित झालेला प्रतिस्पर्धी कर्णधार इयोन मॉर्गन म्हणाला, ‘आम्ही विराटविरुद्ध डावपेच आखले होते. जाधवच्या खेळीची जाणीव नव्हतीच. त्याने आमचा विजय हिरावून घेतला.’ बाराबती स्टेडियम भारतासाठी लकी ठरले. येथे १५ पैकी ११ वन डे भारताने जिंकले. येथे युवराजच्या कामगिरीवर नजर असेल. तो ३०० वन डे पासून केवळ सहा सामने दूर आहे. पहिल्या सामन्यात भारताची गोलंदाजी साधारण झाती. दरम्यान अमित मिश्राला संधी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. (वृत्तसंस्था)>इंग्लंडवरही विजय मिळविण्याचे दडपण आहे. त्यासाठी गोलंदाजीत सुधारणा घडवून आणण्याचे आव्हान कर्णधारापुढे असेल. ख्रिस व्होक्स आणि डेव्हिड व्हिले यांना सुरुवातीला बळी मिळाले पण नंतर सर्वच गोलंदाज निष्प्रभावी ठरले. बेन स्टोक्सने ७३ धावा मोजल्या होत्या.बाराबती स्टेडियमवर मागचा वन डे २ नोव्हेंबर २०१४ ला खेळला गेला. भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३६३ धावा ठोकल्यानंतर लंकेवर १६९ धावांनी विजय साजरा केला. ४ आॅक्टोबर २०१५ ला याच मैदानावर भारताने टी-२० सामना खेळला. त्यात भारत ९२ धावांत बाद होताच सहा गड्यांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. नाराज प्रेक्षकांनी मैदानात कागदी रॉकेट भिरकावल्यामुळे खेळ खोळंबला. यंदा सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.या रेकॉडर््सवर असणार नजर...१०६ धावांची खेळी केल्यास माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय सामन्यात ख्रिस गेलच्या ९,२२१ धावांचा विक्रम मागे टाकेल. असे केल्यास जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी १६व्या स्थानी येईल. आणखी एक शतक ठोकल्यास कर्णधार विराट कोहली श्रीलंकेचा माजी धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्याच्या २८ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करेल. शिवाय, कोहली सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी येईल.चार षटकार ठोकल्यास महेंद्रसिंग धोनी ब्रेंडन मॅक्क्युलमच्या २०० षटकार ठोकण्याचा विक्रम मोडून सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी येईल.पुनरागम करणाऱ्या युवराजला १५० षटकारांचा विक्रम करण्यासाठी एका षटकाराची गरज आहे.अष्टपैलू रवींद्र जडेजाला १५० बळी पूर्ण करण्यासाठी २ बळींची गरज.धावांचा पाठलाग करताना पुन्हा शतक ठोकण्यात कोहली यशस्वी झाला तर तो सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडू शकतो. कोहली व सचिनने धावांचा पाठलाग करताना प्रत्येकी १७ शतक झळकावली आहेत. >उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, जयंत यादव, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्रा.इंग्लंड : इयोन मोर्गन(कर्णधार), जेसन राय, अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रुट, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस व्होक्स, डेव्हिड व्हिले, आदील रशीद, जॅक बॉल, लियाम डॉसन, जॉनी बेयरस्टॉ, सॅम बिलिंग्स, लियॉम प्लंकेट.