शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

आइसलॅँडने केले पोर्तुगालला थंड

By admin | Updated: June 16, 2016 03:57 IST

युरो चषक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या आइसलॅँडसारख्या नवख्या संघाने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील बलाढ्य पोर्तुगालला १-१ असे बरोबरीत रोखण्याची किमया केली.

सेंट एटियेने : युरो चषक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या आइसलॅँडसारख्या नवख्या संघाने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील बलाढ्य पोर्तुगालला १-१ असे बरोबरीत रोखण्याची किमया केली. सामना सुरू होण्यापूर्वीच पोर्तुगालचा विजय निश्चित समजला जात असताना आइसलॅँडच्या कामगिरीने त्यांना मोठा धक्का बसला. नानीने केलेल्या सुंदर गोलमुळे पोर्तुगालने सुरुवातीस आघाडी घेतली. मात्र, आइसलॅँडच्या बिरकिर ब्यार्नासनने गोल करीत सामना बरोबरीत आणला. पोर्तुगालचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची कामगिरी निराशाजनक राहिली. या सामन्यात खेळून त्याने आपल्या देशाच्या लुईस फिगोच्या १२७ सामन्यांत खेळण्याच्या कामगिरीची बरोबरी केली.सामन्याच्या ३१ मिनिटालाच पोतुर्गालच्या नानीने गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये ५० व्या मिनिटाला आइसलॅँडच्या बिरकिर जार्नसनने गोल करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला. सामन्यात बहुतांश वेळ चेंडू आइसलॅँडच्याच गोलक्षेत्रात होता. मात्र, पोर्तुगालला विजयी गोल करता आला नाही. सामन्याच्या पहिल्या हाफमध्येही पोर्तुगालचाच चेंडूवर ताबा होता. मात्र, आइसलॅँडच्या गोमेज, राफेल गुएरिरो या बचावपटूंनी गोल करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. रोनाल्डोची खराब कामगिरी व आइसलॅँडचा गोलरक्षक हॉलडोरोसनयच्या जबरदस्त बचावामुळे पोर्तुगालला यश मिळाले नाही. तसेच आइसलॅँडच्या बचावपटूंनी रोनाल्डो व नानीला रोखण्याची कामगिरी चोख पार पाडली. एल्फ्रेड फिनबोगासने शेवटच्या मिनिटात गोल करण्याचा केलेला प्रयत्नही त्यांनी हाणून पाडला. (वृत्तसंस्था)