शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादचा पंजाबवर ७ गडी राखून विजय

By admin | Updated: May 15, 2016 19:39 IST

पंजाबने दिलेले १८० धावांचे आव्हान हैदराबादने ३ गड्यांच्या मोबदल्यात २० षटकात १८३ धावा करत सहज पार केले. युवराज सिंग आणि डेव्हिड वार्नर या विजयाचे शिल्पकार ठरले.

ऑनलाइन लोकमत

मोहाली, दि. १५ : पंजाबने दिलेले १८० धावांचे आव्हान हैदराबाद संघाने सांघिक कामगीरीच्या जोरावर जहज पार केले. पंजाबने दिलेले १८० धावांचे आव्हान हैदराबादने ३ गड्यांच्या मोबदल्यात २० षटकात १८३ धावा करत सहज पार केले. युवराज सिंग आणि डेव्हिड वार्नर या विजयाचे शिल्पकार ठरले. 
कर्णधार डेव्हिड वार्नरने तडाखेबाज अर्धशतक करत कर्णधारास साजेशी खेळी केली. वार्नरने ४१ चेंडूत ५२ धावा केल्या. शिखर धवन २५, हुड्डा ३४ यांनी ही मोलाचे योगदान दिले. युवराज सिंगने विजयात सिंहाचा वाटा उचलला. शेवटच्या क्षणापर्यंत तो मैदानावर तळ ठोकूण उभा होता. युवराजने २४ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. कंटीगने ११ चेंडूत २१ धावा करत विजयात आपले महत्वपूर्ण योगदान दिले. 
 
त्यापुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हशीम अमलाच्या शानदार अर्धशतकी खेळाच्या जोरावर पंजाब संघाने निर्धारीत २० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावांचा डोंगर उभा केला. फॉर्मात असणारा कर्णधार आणि सलामीवीर मुरली विजय (६) लवकर बाद झाल्यानंतर अमलाने शहा(२७) सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अमला आणि शहाने दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. शहा बाद झाल्यानंतर अमलाने गुरकीत सिंगला साथीला घेत संघाची धावसंख्या वाढवण्याचे काम केले. पण फटकेबाजी करण्याच्या नादात गुरकीत २७ धावावर बाद झाला. गुरकित आणि अमला यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६.१ षटकात ६५ धावांची भागीदारी केली. अमलाने आपला जलवा दाखवताना हैदराबादच्या तगड्या गोलंदाजीला फोडून काढले. ५६ चेंडूचा सामना करताना २ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने शानदार ९६ धावांची अर्घशतकी खेळी केली. मिलरने ९ चेंडूत २० धावांचे योगदान दिले.
हैदराबादकडून हेनरिक्स, मुस्तफ्जूर यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. तर भुवनेश्वर कुमारने २ फलंदाजाना तंबूचा रस्ता दखवला