शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

माजी खेळाडूंच्या प्रतिकूल वक्तव्यामुळे दु:ख : विराट

By admin | Updated: December 11, 2015 00:28 IST

ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत, असे तथाकथित ‘तज्ज्ञ’ माजी खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळ आणि खेळाडूंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे दु:ख होत आहे

नवी दिल्ली : ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत, असे तथाकथित ‘तज्ज्ञ’ माजी खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळ आणि खेळाडूंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे दु:ख होत आहे, असे मत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेवर ३-० ने ऐतिहासिक विजय मिळवूनही काही ‘तज्ज्ञांनी’ संघावर टीका केली होती; यामुळे कोहली नाराज झाला आहे. ‘बीसीसीआय.टीव्ही’शी बोलताना कोहली म्हणाला, ज्यांनी स्वत: क्रिकेट खेळले आहे ते लोक अशा प्रकारची टीका करतात हे पाहून मला त्रास होतो. सर्वजण असे करतात असे मला म्हणायचे नाही. यापैकी काहीजण खेळाडूंची मानसिकता समजून घेतात. ते खेळाडूंना मदत करतात. चांगल्या गोष्टी समजावून सांगतात. कारण कारकिर्दीमध्ये ते या अनुभवातून गेलेले असतात, पण काही लोक केवळ नकारात्मक गोष्टींवर लक्ष देतात. अशा लोकांना पाहून वाईट वाटते. कोहली पुढे म्हणाला, ‘‘ज्या लोकांचा खेळ पहात आपण मोठे झालो त्यांनी अशी टीका टिप्पणी केली तर त्यांच्याविषयी मनात असलेला आदरभाव आपोआपच कमी होतो. जर खेळाडूंमध्ये काही उणीव असल्यास आणि ती त्याला वैयक्तिकपणे निवारण करण्यास मदत केली तर अशा लोकांविषयी आदरभाव निश्चितच वाढेल. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे, त्यांच्याविषयी माझ्या मनात निश्चित आदरभाव राहील. पण ज्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर ते कोणत्या अधिकाराने भाष्य करतात, हे मात्र माझ्या आकलनापलीकडे आहे. (वृत्तसंस्था)