शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यालाही ग्रीनसिग्नल

By admin | Updated: October 23, 2016 03:19 IST

१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाबाबत गोव्याने केलेल्या तयारीबद्दल स्थानिक आयोजन समिती व फिफाच्या १३ सदस्यीय समितीने समाधान व्यक्त

मडगाव : १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाबाबत गोव्याने केलेल्या तयारीबद्दल स्थानिक आयोजन समिती व फिफाच्या १३ सदस्यीय समितीने समाधान व्यक्त करून गोव्याला स्पर्धा आयोजित करण्यास हिरवा कंदील दाखविला. कोची व नवी मुंबईनंतर फिफाकडून निश्चित करण्यात आलेले गोवा हे तिसरे ठिकाण ठरले आहे.फातोर्डा येथे झालेल्या एका कार्यक्रमात फिफा समितीच्या तज्ज्ञांनी गोव्याच्या आयोजनाबाबत केलेल्या सादरीकरणाची प्रशंसा केली. यावेळी स्पर्धेचे संचालक झेवियर सेपी म्हणाले, गोव्याच्या तयारीबद्दल आम्ही पूर्ण समाधानी आहोत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत गोव्याने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. आयोजनाच्या निकषांबाबत काटेकोर अंमलबजावणीवर भर देण्याची गरज आहे. यावेळी गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर, फिफाच्या प्रकल्प अधिकारी ट्रेसी लू उपस्थित होत्या.गेल्या फेब्रुवारीत आम्ही गोव्यातील तयारीचा आढावा घेतला होता. मधल्या सहा महिन्यांत गोव्याने भरीव कामगिरी करताना १६ वर्षांखालील एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. त्यामुळे १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम मान्यता देण्यास आम्हाला कष्ट पडले नाहीत. किंबहुना गोव्याचा तो हक्कच आहे, अशा शब्दांत ट्रेसी लू यांनी गोव्याचा गौरव केला.यावेळी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.फिफाच्या समितीने टिळक मैदान, काणा-बाणावली, बांबोळी स्टेडियम व उतोर्डा येथील मैदानाचीही पाहणी केली. ही तीनही ठिकाणे फुटबॉलपटूंसाठी सरावासाठी उपलब्ध असतील.आज, रविवारी फिफाची समिती तसेच स्थानिक आयोजन समिती दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी करतील.