शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं ! रविवारी भारत - पाकिस्तान भिडणार

By admin | Updated: June 15, 2017 22:36 IST

भारतीयांसाठी 18 तारखेला येणारा रविवार हा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे.

ऑनलाइन लोकमत

ओव्हल, दि. 15 -  भारतीयांसाठी 18 तारखेला येणारा रविवार हा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे. भारतीय फलंदाजांचा एकंदरीत सुधारलेला फॉर्म पाहता अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील लढत रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारत आणि पाकिस्तान या अंतिम सामन्याच्या लढतीत दोन्ही संघ जबरदस्त खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिक खऱ्या अर्थाने रविवारची पर्वणी मिळणार आहे. 10 वर्षांनंतर ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्तानं भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. याआधी 2007ला झालेल्या ICC टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दोन्ही देश एकमेकांना भिडले होते. भारतीय संघ लागोपाठ दुस-यांदा ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. आता बांगलादेशलाही धडा शिकवल्यामुळे भारताच्या कामगिरीत चांगलीच सुधारणा झाली आहे. भारतीय फलंदाज फॉर्मात असून गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, त्याप्रमाणेच क्षेत्ररक्षणही सुधारले आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली रविवारी भारत नक्कीच विजय खेचून आणेल, अशीच विराटच्या चाहत्यांना आशा आहे. युवराज सिंग कारकिर्दीतील 300वा सामना खेळून खिशात घातला आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या चांगले गोलंदाज भारताजवळ असल्यानं भारताची बाजू मजबूत आहे. कागदावर भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र तरीही भारतीय संघ या शेजारी देशाच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. जर भारतानं विजय मिळवला तर क्रिकेट इतिहासात या विजयाची सर्वात मोठ्या विजयांमध्ये नोंद होईल.