शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीचा ‘गोल्डन’ इरा !

By admin | Updated: July 15, 2014 03:41 IST

व्यूहरचना आधीच ठरलेली... लिओनेल मेस्सीला अडकवून ठेवले की, अर्जेंटिनाचे आक्रमण कुचकामी होईल, हे जर्मनीने आधीच हेरलेले...

रिओ दि जानेरो : व्यूहरचना आधीच ठरलेली... लिओनेल मेस्सीला अडकवून ठेवले की, अर्जेंटिनाचे आक्रमण कुचकामी होईल, हे जर्मनीने आधीच हेरलेले... सर्व काही रणनीतीने सुरू होते; परंतु अर्जेंटिनाचेही ‘हौसले बुलंद’ असल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जातो की काय? असा प्रश्न (चिंता) सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ९० मिनिटांत सामना गोलशून्य राहिल्यानंतर अतिरिक्त ३० मिनिटांत चमत्कार झाला. ८८व्या मिनिटाला जर्मनीचा स्टार खेळाडू मिराक्लोव क्लोसेला रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या मारिओ गोत्झेने कुणाच्या ध्यानीमनी नसताना ११३व्या मिनिटाला अप्रतिम गोल केला. सबस्टिट्यूट म्हणून मैदानावर उतरलेल्या अँड्रे स्कुरल आणि गोत्झे यांनी २४ वर्षांचा जर्मनीचा जेतेपदाचा दुष्काळ संपविला. डाव्या कॉर्नरवरून अर्जेंटिनाची बचावफळी भेदत स्कुरलने गोलपोस्टच्या दिशेने टोलावलेला चेंडू गोत्झेने पहिला आपल्या छातीवर झेलला आणि नंतर डाव्या पायाने किक मारून तो गोलमध्ये रूपांतरित केला. १९९०च्या इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हा क्षण होता. जर्मनीने या आघाडीबरोबरच सामना १-० असा जिंकून ३.५ कोटी डॉलर्सचे पारितोषिक आणि विश्वचषक आपल्या नावावर केला. सामन्याच्या सुरुवातीला चेंडूवर जर्मनीचा ताबा असला तरी अर्जेंटिनाचे खेळाडू आक्रमक होते. ३0 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या हिगुएनने चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली; परंतु लाईनमन यांनी तो आॅफसाईड दिला. त्यामुळे हिगुएनचा जल्लोष अल्पकाळातच हवेत विरला. त्यानंतर मेस्सीने दोनदा आक्रमण केले; परंतु ते सार्थकी लागले नाही. ३६ व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा गोलरक्षक रोमेरोने एक फटका अलगद झेलून गोल वाचविला. दुसऱ्या हाफमध्ये हाच धमाका कायम राखत जर्मनीने सामन्यातील रंजकता आणखी ताणली. अर्जेंटिनाचे प्रशिक्षक अलजेंड्रो सॅबेल्ला यांनी इझेक्वील लॅवेझ्झी याच्याबदली सेर्गिओ अ‍ॅगुएरो याला मैदानात उतरवले. अ‍ॅगुएरो हा आक्रमक आणि तितकाच चतुर खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याच्या या लेट एन्ट्रीने अर्जेंटिनाला थोडी फार मदत मिळेल, असा अंदाज सॅबेल्ला यांनी बांधला असावा, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. सामन्याची वेळ संपत येईल तसे दोन्ही प्रशिक्षकांनी आपआपले खेळाडू बदलले, पण तरीही गोलफलक हलला नाही. शेवटी पूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्याने एक्स्ट्रा टाईम देण्यात आला. (वृत्तसंस्था)