शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत गगनजित भुल्लर विजेता

By admin | Updated: October 2, 2016 19:21 IST

भारताचा अव्वल गोल्फपटू गगनजित भुल्लरने चौथ्या आणि शेवटच्या फेरीत ४ अंडर ६७ आणि एकूण १५ अंडर २६९ गुणांची खेळी करून १० लाख डॉलर

 
शिवाजी गोरे/ऑनलाइऩ लोकमत
 
 
सोल, दि. 2- भारताचा अव्वल गोल्फपटू गगनजित भुल्लरने चौथ्या आणि शेवटच्या फेरीत ४ अंडर ६७ आणि एकूण १५ अंडर २६९ गुणांची खेळी करून १० लाख डॉलर रोख पुरस्काराच्या कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत विजेतेपद जिंकले.  गगनजितचा एशियन टूरमधील सहावे आणि एकूण सातवे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.  
 
'गेली दोन वर्षे माझ्या कारर्किदीतील सर्वांत कठीण काळ होता. या काळात मी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळेच आज हे जेतेपद जिंकू शकलो. हे विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण या जेतेपदामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे' असं गगनजीत म्हणाला.
 
 
दोन वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करून जेतेपद जिंकणाºया २८ वर्षीय गगनजितने चार राऊंडमध्ये ६८, ६६, ६८ व ६७ गुणांची (कार्ड) खेळी केली. तो शनिवारी तिसºया राऊंडच्या शेवटी संयुक्त चौथ्या क्रमांंकावर होता. कपूरथळाच्या गगनजितने जबरदस्त खेळी करून झिम्बाब्वेचा स्कॉट व्हिन्सेंट आणि स्थानिक गोल्फपटू तेईवू किमला एका शॉटच्या अंतराने मागे टाकून विजेतेपद आपल्या नावावर केले. गगनजितला हे विजेतेपद जिंकल्यानंतर एकूण १ लाख ९६ हजार डॉलरचे रोख पारितोषिक मिळाले. या विजेतेपदाने गगनजितचा दोन वर्षांचा चषक जिंकण्याचा दुष्काळ संपला आहे. त्याने एशियन टूरमध्ये २०१३ मध्ये शेवटचे जेतेपद जिंकले होते. २०१४ मध्ये तो मनगटाच्या दुखापतीमुळे त्रस्त होता.