शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

पहिला दिवस धवल कुलकर्णीचा

By admin | Updated: February 25, 2016 03:46 IST

धवल कुलकर्णीच्या (३० धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या बळावर दिवसअखेर मुंबईने सौराष्ट्राला ८ बाद १९२ धावांत रोखण्याची कामगिरी केली. अर्पित वासवदाने पाऊणशतकी

पुणे : धवल कुलकर्णीच्या (३० धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या बळावर दिवसअखेर मुंबईने सौराष्ट्राला ८ बाद १९२ धावांत रोखण्याची कामगिरी केली. अर्पित वासवदाने पाऊणशतकी व प्रेरक मंकडने नाबाद अर्धशतकी खेळी करून संघाचा कोसळणारा डाव सावरला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारपासून रणजी चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यास सुरुवात झाली. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवून सौराष्ट्रावर वर्चस्व मिळविले. धवल कुलकर्णीने सातव्या षटकात अवी बारोत याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करून पहिला झटका दिला. पुढच्या षटकात शार्दूल ठाकूरने दुसरा सलामीचा फलंदाज सागर जोगियानीला आदित्य तारे याच्याकरवी झेलबाद करून दुसरा झटका दिला. सौराष्ट्राची सलामीची जोडी २२ धावांवर परतली. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराला (४) कुलकर्णीने सूर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ३६ धावांवर तिसरा बळी टिपला. त्यानंतर आलेला शेल्डन जॅक्सन भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. जयदेव शहा (१३), चिराग जैन (१३), दीपक पुनिया (६) हे झटपट बाद झाले. कुलकर्णी व शार्दूल ठाकूर यांनी पाठोपाठ धक्के दिले. अभिषेक नायर व बलविंदर संधू यांनीदेखील प्रत्येकी १ बळी घेऊन त्यांना साथ दिली. सौराष्ट्राचे ७ फलंदाज १०८ धावांतच तंबूत परतले. तर, संघाचा धावफलक शंभरीवर जाण्यासाठी ५०व्या षटकाची वाट पाहावी लागली.अर्पित वासवदा व नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला प्रेरक मंकड यांनी संघाचा कोसळणारा डाव सावरला. वासवदाने ६ चौकारांच्या साह्याने २१४ चेंडूंत ७७ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. वासवदा-मंकड ही जोडी जमलेली असताना कुलकर्णीने दिवसाच्या शेवटच्या षटकात वासवदाला यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ही जोडी फोडली व संघाला आठवा धक्का दिला. प्रेरक मंकड ११९ चेंडूंत ५ चौकारांसह ५५ धावा फटकावून नाबाद राहिला. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलक : सौराष्ट्र पहिला डाव : ८४.४ षटकांत ८ बाद १९२, अवी बारोत १४, सागर जोगियानी ८, अर्पित वासवदा ७७, शेल्डन जॅक्सन ०, प्रेरक मंकड नाबाद ५५, धवल कुलकर्णी ४/३०, शार्दूल ठाकूर २/५९, अभिषेक नायर १/४२, बलविंदरसिंग संधू १/४१.