शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

फेडरर सिनसिनाटी ओपनच्या फायनलमध्ये

By admin | Updated: August 18, 2014 02:24 IST

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने उत्कृष्ट खेळ करताना सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे़

सिनसिनाटी : स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने उत्कृष्ट खेळ करताना सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे़ जेतेपदासाठी त्याची झुंज स्पेनच्या डेव्हिड फेररशी रंगणार आहे़ महिला गटात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे़ विजेतेपदासाठी तिचा सामना सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविचशी होणार आहे़ १७ ग्रँड स्लॅम आपल्या नावे करणाऱ्या फेडरर याने उपांत्य फेरीच्या सामन्यात आक्रमक खेळ करताना पाचवे मानांकन प्राप्त कॅनडाच्या मिलोस राओनिकवर सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ अशी मात करीत फायनलमध्ये स्थान मिळविले़ फायनलमध्ये फेडररसमोर आता डेव्हिड फेररशी झुंजावे लागणार आहे़ दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सहावे मानांकन प्राप्त फेरर याने फ्रान्सच्या जुलिअन बेनातूवर ६-३, ६-२ अशी सरशी साधून अंतिम फेरी गाठली़ महिला गटात अनुभवी सेरेना विल्यम्स हिने उपांत्य फेरीच्या लढतीत १२वे मानांकन प्राप्त डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकीला २-६, ६-२, ६-४ अशी धूळ चारून थाटात फायनलमध्ये प्रवेश केला़ अजिंक्यपदासाठीच्या सामन्यात सेरेनाला सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविचचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे़ महिला गटात दुसऱ्या उपांत्य फेरीत इव्हानोविचने रशियन टेनिसपटू आणि फ्रेंच ओपन चॅम्पियन मारिया शारोपोव्हा हिचा ६-२, ५-७, ७-५ अशा गुणफरकाने पराभव केला. (वृत्तसंस्था)