शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

फेडरर, शारापोव्हाचे लक्ष्य अजिंक्यपद

By admin | Updated: January 15, 2015 03:09 IST

ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविल्यामुळे स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आणि रशियन सुंदरी मारिया शारापोव्हा यांचा आत्मविश्वास उंचावला आहे़

मेलबोर्न : ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविल्यामुळे स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आणि रशियन सुंदरी मारिया शारापोव्हा यांचा आत्मविश्वास उंचावला आहे़ याच बळावर पुढील आठवड्यात होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपनचे अजिंक्यपद मिळविणे हे त्यांचे लक्ष्य असेल. सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिन्का यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल़फेडररने रविवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनलच्या फायनलमध्ये कॅनडाच्या मिलोस राओनिकला धूळ चारून जेतेपद मिळविले होते़ हा त्याचा हजारावा विजय होता़ याच कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे़ त्यामुळे हा खेळाडू आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदाल यांचे आव्हान सहज मोडून काढेल, अशी शक्यता आहे़ स्पेनचा अनुभवी टेनिसपटू नदाल याने दुखापतीनंतर कोर्टवर कमबॅक केल होते़ मात्र, त्याला दोहा येथील पहिल्याच सामन्यात जर्मनीचा क्वालिफायर मायकल बेरर याच्याकडून मात खावी लागली होती़ त्यामुळे आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याच्याकडून विशेष कामगिरीची अपेक्षा नाही़ मात्र, नोव्हाक जोकोविच, ब्रिटनचा अँडी मरे, राओनिक आणि जपानचा केई निशिकोरी या खेळाडूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आहे़मारिया शारोपोव्हा हिने ब्रिस्बेन इंटरनॅशनलच्या फायनलमध्ये अ‍ॅना इवानोविचवर मात करून जेतेपदाला गवसणी घातली होती़ तिचा हा कारकिर्दीतला ३४वा किताब होता़ मारिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे़ आॅस्ट्रेलियन ओपनमध्येही फॉर्म कायम राखून अजिंक्यपद मिळविण्यासाठी ती आतुर आहे़अमेरिकेची सेरेना विल्यम्स या स्पर्धेत सहाव्यांदा किताब आपल्या नावे करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल़ मात्र, पर्थमध्ये झालेल्या होपमन चषकात तिला लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता़ महिला गटात शारापोव्हा, सेरेना यांच्याव्यतिरिक्त अ‍ॅना इवानोविच, सिमोना हालेप, एग्निस्ज्का रंदावास्का, आपले नशीब अजमावीत आहेत़ (वृत्तसंस्था)