शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियन संघात वेगवान गोलंदाजांचा जास्त भरणा

By admin | Updated: January 4, 2016 23:57 IST

आॅस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सोमवारी जाहीर केलेल्या १३ सदस्यीय संघात जास्त वेगवान गोलंदाजांचा भरणा केला आहे

सिडनी : आॅस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सोमवारी जाहीर केलेल्या १३ सदस्यीय संघात जास्त वेगवान गोलंदाजांचा भरणा केला आहे. या संघात फिरकी गोलंदाज नाथन लियोन आणि अष्टपैलू शेन वॉटसन यांना स्थान देण्यात आले नाही.पर्थ, मेलबोर्न आणि सिडनी येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक ठरणार आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन लढतींसाठी, तर गोलंदाजांची आवश्यकतादेखील भासणार नाही.निवड समितीचे अध्यक्ष रॉड मार्श यांनी स्कॉट आणि पॅरिस हे दोघेही संघात स्थान मिळविण्यास पात्र होते, असे सांगितले. ते म्हणाले की, ‘स्कॉट सातत्याने निवड समितीला प्रभावित करीत होता. त्याने या वर्षी व्हिक्टोरियाकडून खूप चांगली गोलंदाजी केली व निश्चितच तो मोठ्या पातळीवर खेळण्यास योग्य होता.’आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारत प्रथम पाच वनडे सामने खेळणार आहे. हे वनडे सामने पर्थ (१२ जानेवारी), ब्रिस्बेन (१५ जानेवारी), मेलबोर्न (१७ जानेवारी), कॅनबरा (२0 जानेवारी) आणि सिडनी (२३ जानेवारी) येथे खेळवले जातील. वनडे मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-२0 मालिका होणार आहे. (वृत्तसंस्था)> आॅस्ट्रेलियन संघ पुढीलप्रमाणे : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जॉर्ज बेली, स्कॉट बोलँड, जोश हेजलवूड, जेम्स फॉकनर, आरोन फिंच, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, जोल पॅरिस आणि मॅथ्यू वेड.