युरो कप : स्वीडनवर १-0 ने विजय

By Admin | Updated: June 23, 2016 21:13 IST2016-06-23T21:12:10+5:302016-06-23T21:13:28+5:30

गोलच्या जोरावर बेल्जियमने स्वीडनवर १-0 ने विजय मिळवून युरो चषक २0१६ च्या अंतिम १६ जणांच्या संघात प्रवेश केला.

Euro Cup: 1-0 win over Sweden | युरो कप : स्वीडनवर १-0 ने विजय

युरो कप : स्वीडनवर १-0 ने विजय

ऑनलाइन लोकमत

नाईस, दि. 23 - सामना संपण्यास काही मिनिटेच शिल्लक असताना मिडफिल्डर रादजा नॅनगोलानने केलेल्या गोलच्या जोरावर बेल्जियमने स्वीडनवर १-0 ने विजय मिळवून युरो चषक २0१६ च्या अंतिम १६ जणांच्या संघात प्रवेश केला.
या पराभवामुळे स्वीडनचा सुपरस्टार ज्लाटन इब्राहिमोविच याला एका वाईट आठवणीसह आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम करावा लागला.
नॅनगोलानने ईडन हॅजार्डच्या क्रॉसवर ८२ व्या मिनिटाला गोल नोंदवला. यामुळे संघ पुढील फेरी गाठू शकला त्यांचा सामना आता २६ जूनला हंगेरीशी होणार आहे. स्वीडनचा संघ गटात तिसऱ्या स्थानावर राहिला. गटातील समीकरणामुळे अंतिम १६ जणात पोहचण्यासाठी दोन्ही संघाला विजयाची गरज होती. त्यामुळे दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. बेल्जियमने यात बाजी मारली.

Web Title: Euro Cup: 1-0 win over Sweden