शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशविरुद्ध इंग्लंडची स्थिती भक्कम

By admin | Updated: October 23, 2016 03:18 IST

बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शनिवारी इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात आपली स्थिती मजबूत केली. शाकिब अल-हसनने ७९ धावांच्या

चितगाव : बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शनिवारी इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात आपली स्थिती मजबूत केली. शाकिब अल-हसनने ७९ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत बांगलादेशचे आव्हान कायम राखले. स्टोक्सच्या ८५ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने आज, तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८ बाद २२८ धावांची मजल मारली. त्याआधी, सकाळच्या सत्रात त्याने ३ बळी घेत बांगलाचा डाव २४८मध्ये गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाहुणा इंग्लंड संघाकडे एकूण २७३ धावांची आघाडी असून त्यांच्या दोन विकेट शिल्लक आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर ही चांगली धावसंख्या मानल्या जात आहे. चौथ्या डावात येथे फलंदाजी करणे कठीण आहे. स्टोक्सने खडतर खेळपट्टीवर १५१ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली. त्याला जॉनी बेयरस्टॉची चांगली साथ लाभली. स्टोक्सने बेयरस्टॉसोबत सहाव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली. एकवेळ इंग्लंडचा निम्मा संघ ६२ धावांत तंबूत परतला होता. बेयरस्टॉला वैयक्तिक ४७ धावांवर कमरुल इस्लामने माघारी परतवले. त्यानंतर शाकिबने स्टोक्सला माघारी परतवले. शाकिबने आदिल रशीदला बाद करीत १५ व्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. त्याआधी, कालच्या ५ बाद २२१ धावसंख्येवरुन खेळताना बांगलादेशचा डाव २४८ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडतर्फे स्टोक्सने २६ धावांच्या मोबदल्यात एकूण ४ बळी घेतले. (वृत्तसंस्था)