शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड उपांत्य फेरीत

By admin | Updated: March 27, 2016 01:11 IST

जोस बटलरची वादळी खेळी आणि ख्रिस जॉर्डनने त्याच्या कारकिर्दीतील केलेल्या सर्वोत्तम कामगिरीने उतार-चढाव आलेल्या रोमहर्षक सामन्यात अँजोलो मॅथ्यूजच्या सुरेख

नवी दिल्ली : जोस बटलरची वादळी खेळी आणि ख्रिस जॉर्डनने त्याच्या कारकिर्दीतील केलेल्या सर्वोत्तम कामगिरीने उतार-चढाव आलेल्या रोमहर्षक सामन्यात अँजोलो मॅथ्यूजच्या सुरेख कामगिरीवर पाणी फेरले. त्याचबरोबर इंग्लंडने श्रीलंकेचा १0 धावांनी पराभव करीत आयसीसी विश्व टी-२0 च्या उपांत्य फेरीत धडक मारली. इंग्लंडच्या विजयाने दक्षिण आफ्रिकेचाही पत्ता कट झाला आहे.विजयासाठी १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ ८ बाद १६१ या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. श्रीलंकेची सुरुवात सनसनाटी झाली. पहिल्या तीन षटकांपर्यंत श्रीलंकेची स्थिती ४ बाद १५ अशी दयनीय झाली होती. त्यानंतर मॅथ्यूजने कर्णधाराला शोभेल अशी खेळी करताना ५४ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. तसेच त्याने चमारा कापुगेदरा (३0) याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ८0 धावांची भागीदारी केली; परंतु दबावात विकेट पडत गेल्या. जॉर्डनने २८ धावांत ४ आणि डेव्हिड विली याने २६ धावांत २ गडी बाद केले. या विजयामुळे इंग्लंड ग्रुप एकमधून वेस्ट इंडीजनंतर सेमीफायनल गाठणारा दुसरा संघ ठरला, तर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशेवर पाणी फेरले गेले. इंग्लंडचे चार सामन्यांत ३ विजयांसह ६ गुण झाले आहेत, तर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघांचे तीन सामन्यात फक्त २ गुण आहेत. त्याआधी जोस बटलर याच्या वादळी खेळीने इंग्लंडने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७१ अशी मजबूत धावसंख्या उभारली.फिरोजशाह कोटलाची खेळपट्टी थोडी संथ वाटत होती; परंतु त्यावरही गवत होते. त्यामुळे फलंदाजांजवळ मोठे फटके खेळण्याची पुरेशी संधी होती. बटलरने ३७ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह नाबाद ६६ धावा केल्या आणि यादरम्यान कर्णधार इयॉन मॉर्गन (२२) याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी केली. त्याआधी सलामीवीर जेसन राय (३९ चेंडूंत ४२ धावा) आणि जो रुट (२५) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी करीत सुरुवातीच्या धक्क्यातून इंग्लंडला सावरले होते.श्रीलंका संघासाठी अँजलो मॅथ्यूज आणि दोन्ही फिरकी गोलंदाज रंगना हेराथ (२७ धावा१ बळी), जेफ्री वंडारसे (२६ धावांत २ बळी) यांनी टिच्चून मारा केला. या तिघांनी एकूण १२ षटकांत फक्त ७८ धावा दिल्या; परंतु अन्य गोलंदाजांनी आठ षटकांत ९३ धावा प्रतिस्पर्धी संघाला दिल्या.हेराथने दुसऱ्याच षटकात अ‍ॅलेक्स हेल्सला पायचीत करीत इंग्लंडला सुरुवातीलाच जोरदार धक्का दिला; परंतु त्यानंतर राय आणि रुट यांनी सहजतेने धावा करताना खराब चेंडूची प्रतीक्षा केली. पॉवरप्ले संपल्यानंतर इंग्लंडची स्थिती १ बाद ३८ अशी होती.संक्षिप्त धावफलक इंग्लंड : २0 षटकात ४ बाद १७१. (बटलर नाबाद ६६, राय ४२, मॉर्गन २२, जो रुट २५. वंडारसे २/२६, हेराथ १/२७)श्रीलंका : २0 षटकात ८ बाद १६१. (मॅथ्यूज नाबाद ७३, कापुगेदारा ३0, थिसारा परेरा २0, दासुन शनाका १५. जॉर्डन ४/२८, विली २/२६, प्लंकेट १/२३).