शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: March 1, 2015 00:27 IST

गतविजेत्या कर्नाटकने अचूक माऱ्याच्या जोरावर मुंबईचा दुसरा डाव ३३२ धावांत गुंडाळून ११२ धावांनी बाजी मारली आणि सलग दुसऱ्या वर्षी रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

बंगळुरू : गतविजेत्या कर्नाटकने अचूक माऱ्याच्या जोरावर मुंबईचा दुसरा डाव ३३२ धावांत गुंडाळून ११२ धावांनी बाजी मारली आणि सलग दुसऱ्या वर्षी रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. लाडने एकाकी लढत देताना १४३ चेंडूंत ७४ धावांची खेळी केली. कर्नाटकसाठी निर्णायक अष्टपैलू खेळी करणाऱ्या अभिमन्यू मिथूनने दुसऱ्या डावात सर्वाधिक ४ बळी घेताना मुंबईचे आव्हान संपुष्टात आणले.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईला विजयासाठी ४४५ धावांचे आव्हान होते. मात्र पहिल्याच दिवशी २२ खेळाडू बाद झालेल्या खेळपट्टीवर हे आव्हान कठीण होते. त्यात तिसऱ्या दिवसअखेर मुख्य फलंदाज माघारी परतल्याने मुंबईसमोर अडचणी वाढल्या होत्या. अशा परिस्थितीत मुंबईची मदार सिद्धेश लाड व अभिषेक नायर या शेवटच्या नियमित फलंदाज जोडीवर होती.क्षेत्ररक्षण करताना डोक्याला दुखापत झालेली असतानादेखील तिसऱ्या दिवशी संघाची गरज ओळखून नायर मैदानात उतरला. या दोघांनी तिसऱ्या दिवसअखेर मुंबईला ६ बाद २७७ अशी मजल मारून दिली. मात्र चौथ्या दिवशी डोक्याच्या दुखापतीतून नायर सावरलेला दिसत नसल्याने त्याला न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला व चौथ्या दिवशीच्या सुरुवातीलाच लाडच्या सोबतीला बलविंदर संधू फलंदाजीला आला.लाडने अतिशय जबाबदारीपूर्वक खेळ करताना ११२ चेंडूंत शानदार अर्धशतक झळकावले. यानंतर मिथूनने संधूला (५) पायचीत पकडले. या वेळी फलंदाजीला आलेल्या शार्दुल ठाकूरला पुढच्याच चेंडूवर जीवदान मिळाले. याचा फायदा उचलून ठाकूरने दोन चौकारांसह लाडला चांगली साथ देत मुंबईला तीनशेचा पल्ला गाठून दिला. मात्र यानंतर कर्नाटकने पुढील ३२ धावांत मुंबईचा डाव संपुष्टात आणला. पहिल्या डावात २० धावांत ६ बळी घेऊन मुंबईचा कर्दनकाळ ठरलेल्या विनयकुमारची सामनावीर म्हणून निवड केली गेली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :च्कर्नाटक (पहिला डाव) : सर्व बाद २०२ धावाच्मुंबई (पहिला डाव) : सर्व बाद ४४ धावाच्कर्नाटक (दुसरा डाव) : सर्व बाद २८६ धावाच्मुंबई (दुसरा डाव) : तरे झे. उथप्पा गो. अरविंद ९८, हेरवाडकर पायचीत गो. मिथून ३१, अय्यर झे. जे. सुचिथ गो. मिथून ५०, यादव झे. उथप्पा गो. मिथून ३६, लाड झे. उथप्पा गो. अरविंद ७४, पाटील झे. कपूर गो. विनय ०, मोटा त्रि. गो. गोपाळ ९. नायर रिटायर्ड हर्ट २, संधू पायचीत गो. मिथून ५, ठाकूर झे. विनय गो. गोपाळ १३, हरमीत नाबाद २. अवांतर: १२. एकूण : १२१.१ षटकांत सर्व बाद ३२२ धावा.गोलंदाजी :विनय ३२-६-१०१-१; मिथून ३४-१४-६९-४; अरविंद २१.१-६-६४-२; गोपाळ २७-५-६८-२; नायर ३-०-१०-०; समर्थ ४-१-९-०.