शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चेक संघाविरुद्ध चमत्कार घडवू : पेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2015 00:05 IST

चेक प्रजासत्ताकविरुद्ध भारतीय संघ भक्कम वाटत असून, विश्व प्ले आॅफ लढतीत आम्ही चमत्कार घडवू, असा आशावाद अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : चेक प्रजासत्ताकविरुद्ध भारतीय संघ भक्कम वाटत असून, विश्व प्ले आॅफ लढतीत आम्ही चमत्कार घडवू, असा आशावाद अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने व्यक्त केला आहे.शुक्रवारी आर. के. खन्ना स्टेडियमवर लढतीला सुरुवात होत असून, गुरुवारी सोडत काढण्यात आली. त्यानंतर पेस म्हणाला, ‘युकी, सोमदेव, बोपण्णा असे सहकारी सोबत आहे. आनंद अमृतराज यांचे मार्गदर्शन आहे. आमचे या लढतीकडे बारकाईने लक्ष असून पहिल्या दिवशी किमान एका विजयाची आम्हाला गरज राहील.’ अमेरिकन ओपनमधील मिश्र दुहेरीचा चॅम्पियन असलेला पेस पुढे म्हणाला, ‘युकीने नुकतेच शांघाय चॅलेंजर जिंकले. सोमदेव फिट आहे. रोहन हा सर्वोत्कृष्ट टेनिस खेळत आहे. प्रत्येकाची स्वत:ची शैली असते आणि तो आपल्या कुवतीनुसार योगदान देतो. सध्या दोन्ही संघांतील खेळाडू दिल्लीची गर्मी आणि वातावरणातील दमटपणा यावर कशी मात करतात यावर यशाचे गणित विसंबून असेल. अशा वातावरणात पाच सेटपर्यंत सामना लांबल्यास फिटनेस टिकवून ठेवण्याचे अवघड आव्हान राहील.’यूएस ओपनमधील हार्ड कोर्ट तसेच आर. के. खन्नाचे हार्ड कोर्ट यावर खेळताना काय फरक जाणवतो, असे विचारताच पेस म्हणाला, ‘मी येथे २६ वर्षांपासून खेळत आहे. अनेक डेव्हिस चषक सामने येथेच खेळल्यामुळे कोर्टचा चांगलाच अभ्यास झाला आहे. ‘हार्ड कोर्ट ते हार्ड कोर्ट’ हा प्रवास कठीण नाही.’ दिल्लीची गरमी भयंकर असल्याचे सांगून पेस म्हणाला, ‘काल सायंकाळी ७ वाजता सराव करताना खूप दमटपणा होता. दिवसा फारच गरम असते. कोर्टवर उसळी असल्याने दीर्घ रॅली अपेक्षित आहेत. यामुळे फिटनेसची कसोटी राहील. युकी आणि सोमदेव दीर्घ रॅली खेळण्यात येथे पटाईत आहेत.’(वृत्तसंस्था)