थोडी शरम बाळगा, विराट भडकला

By Admin | Updated: March 28, 2016 14:56 IST2016-03-28T14:51:37+5:302016-03-28T14:56:54+5:30

नेटीझन्स अनुष्का शर्माला विसरलेले नाहीत. त्यामुळे विराट कोहली भडकला असून, त्याने सोशल मिडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.

Do not be ashamed of anything, Virat Bhadkala | थोडी शरम बाळगा, विराट भडकला

थोडी शरम बाळगा, विराट भडकला

ऑनलाइन लोकमत 

मोहाली, दि. २८ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयाचा नायक ठरलेल्या विराट कोहलीवर सोशल मिडीयामधून कौतुकाचा वर्षाव होत असला तरी, नेटीझन्स अनुष्का शर्माला विसरलेले नाहीत. त्यामुळे  विराट कोहली भडकला असून, त्याने टि्वटरवरुन आपला संताप व्यक्त केला आहे. 
 
'अनुष्काला लक्ष्य करणा-यांनो थोडी शरम बाळगा'. अनुष्काकडून मला नेहमीच सकारात्मकता शिकायला मिळाली आहे असे टि्वट करुन विराटने उत्तर दिले आहे. अनुष्काशी प्रेमसंबंध तुटल्यामुळे विराट अफलातून कामगिरी करत असल्याचे मॅसेजेस सोशल मिडीयावर फिरत आहेत. 
 
या मॅसेजेसमध्ये विराटला वर्ल्डकप विजयापर्यंत अनुष्कापासून दूर रहाण्याचा सल्ला दिला जात आहे. अलीकडेच या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. दोघे विभक्त झाले आहेत. मात्र नेटीझन्स विराटला अनुष्काचा विसर पडणार नाही याची काळजी घेत आहेत.
 
 
 

Web Title: Do not be ashamed of anything, Virat Bhadkala